राज्यात यंदा अकरावीच्या प्रवेशांची एकूण क्षमता ही 20 लाख 43 हजार 254 इतकी आहे. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक 8 लाख 52 हजार 206 जागांचा समावेश आहे. दरम्यान, अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सोमवारपासून सुरू झाली आहे. या फेरीतील पहिले दोन दिवस म्हणजेच 19 व 20 मे हे प्रवेश नोंदणी सरावासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात येत्या बुधवारपासून दि. 21 मे प्रवेशासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) करता येणार आहे.
यंदा 6 लाख जागा रिक्त?
दहावीच्या परिक्षेत यंदा राज्यात जवळपास 14.5 लाख विद्यार्थी पास झाले आहेत, अशा परिस्थितीत 6 लाख जागा रिक्त राहतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा सध्या व्यवसायाभिमुख आणि तंत्रशिक्षणाकडे ओढा वाढत आहे. अशा परिस्थितीत या जागा रिक्त राहण्यााचा अंदाज आहे. दि. 21 मे रोजी सकाळी 11वाजल्यापासून प्रत्यक्षात नोंदणी सुरू केली जाणार आहे. ही नोंदणी येत्या 28 मे 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत करता येणार आहे. या नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना किमान 1 ते कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. व्यवस्थापन, इन-हाऊस व अल्पसंख्याक कोट्यातील प्रवेशासाठी प्रत्येक फेरीपूर्वी तपासणी आवश्यक आहे

पहिल्या फेरीचे उर्वरित वेळापत्रक पुढीलप्रमाणे
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे — दि. 30 मे, सकाळी 11 वाजता
हरकती व दुरूस्ती करणे — दि. 30 मे ते 1 जून 2025 सायंकाळी 4 वाजेपर्यंत
हरकती व दुरुस्ती प्रक्रिया लॉगीनद्वारे — दि. 3 जून 2025 सायंकाळी वाजेपर्यंत
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे — दि. 5 जून 2025
गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप करणे (शून्य फेरी) — दि. 6 जून 2025 सकाळी 10 वाजता
वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर टाकणे — दि. 6 जून सकाळी 11 वाजता
प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे व आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी करणे (पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य) — दि. 6 जून सकाळी 11 वाजल्यापासून 12 जून रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत
दुसऱ्या फेरीतील रिक्त जागांची यादी जाहीर करणे —- दि. 14 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत
कॅप (CAP) किंवा कोटामार्फत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाणार एकदा विद्यार्थ्यांने संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतल्यास, त्याचा प्रवेश निश्चित मानण्यात येणार प्रवेश नोंदणी शुल्क डिजिटलमाध्यमातूनच स्विकारला जाणार सर्वानी प्रवेशाच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करणे आवश्यक व्यवस्थापन कोटा इन-हाऊस किंवा अल्पसंख्याक कोट्यांतील प्रवेश 6 जून 2025 पासून सुरू होणार.