अहिल्यानगरच्या सुपुत्राला जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण, ज्या शाळेत शिकला तिथेच अंत्यसंस्कर होणार

संदीप गायकर यांचे शालेय शिक्षण ब्राम्हणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयात झाले होते. याच सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात गायकर यांच्यावर उद्या (२४ मे) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

Soldier Sandeep Gaiker martyred : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आले आहे. संदीप गायकर हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे सुपूत्र होते.

या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळं ब्राम्हणवाडा गाव आज आणि उद्या बंद ठेवण्यात आले आहे.

ज्या शाळेत शिक्षण घेतले, तिथेच अंत्यसंस्कार

संदीप गायकर यांचे शालेय शिक्षण ब्राम्हणवाडा गावातील सह्याद्री विद्यालयात झाले होते. याच सह्याद्री विद्यालयाच्या प्रांगणात गायकर यांच्यावर उद्या (२४ मे) लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

गाव शोकसागरात

दरम्यान, संदीप गायकर यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर मोठ संकट कोसळले आहे. आपल्या घरातील एकुलता एक मुलगा निघून गेला याचा दुःख कुटुंबाला झाले आहे. संदीप गायकर यांच्या पश्चात दीड वर्षाचा मुलगा, पत्नी आणि आई-वडील असा परिवार आहे. संदीप गायकर यांच्या मृत्यूने गावकरी शोकसागरात बुडाले आहेत.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News