Microsoft ने एक नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्हिडिओ जनरेटर टूल Bing Video Creator लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स आता फक्त काही शब्द लिहून की त्यांना काय पाहायचे आहे, त्याचा छोटा AI व्हिडिओ तयार करू शकतात. हे टूल Bing Image Creator प्रमाणेच कार्य करते, परंतु यामध्ये फोटोंच्याऐवजी व्हिडिओ तयार केला जातो. ही सुविधा OpenAI च्या Sora मॉडेलवर आधारित आहे.
Bing Video Creator काय करू शकतो?
Bing Video Creator सध्या 5 सेकंदांचे AI व्हिडिओ तयार करू शकतो.
ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे आणि सध्या Bing मोबाईल अॅपद्वारे उपलब्ध आहे.
डेस्कटॉप व्हर्जन लवकरच येण्याची अपेक्षा आहे.
हे टूल कोणतेही क्लिष्ट एडिटिंग सॉफ्टवेअर वापरल्याशिवाय व्हिडिओ तयार करण्याची सोपी पद्धत देते. तुम्हाला फक्त तुमचे विचार लिहायचे आहेत.
Microsoft म्हणते, “तुम्ही कल्पनांना साकार करायचे असो किंवा एखादी कथा दाखवायची असो, Bing Video Creator तुमच्या कल्पनांना व्हिडिओमध्ये बदलण्याची ताकद देतो.”

कसा करावा वापर?
Bing मोबाइल अॅप डाउनलोड करा (iOS किंवा Android वर).
अॅपमध्ये खाली उजव्या कोपऱ्यात असलेल्या मेनूमधून “Video Creator” निवडा किंवा सर्च बारमध्ये तुमचा प्रॉम्प्ट लिहा.
AI टूल तुमच्या डिस्क्रिप्शननुसार व्हिडिओ तयार करायला सुरुवात करेल.
जितका सविस्तर आणि अचूक वर्णन द्याल, तितका व्हिडिओ चांगला बनेल.
सध्या व्हिडिओ vertical फॉरमॅटमध्ये (9:16) तयार होतात.
horizontal फॉरमॅट (16:9) वर सध्या काम सुरू आहे.
एकावेळी कमाल तीन व्हिडिओ तयार करता येतात.
सर्व व्हिडिओ 90 दिवसांपर्यंत सेव्ह राहतात आणि तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंवा लिंकद्वारे शेअर करू शकता.