तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का, वटवाघळं नेहमी उलटे का झोपतात? जाणून घ्या

वटवाघूळ झाडांवर उलटे लटकतात, कारण त्यांना उड्डाण घेण्यासाठी आणि झोपण्यासाठी हे सोयीचे असते.

तुम्ही जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहिले असतील, तुम्हाला हे देखील माहित असेल की प्रत्येक प्राण्याचे स्वतःचे वेगळे वैशिष्ट्य असते. खरंतर काही प्राणी रांगतात, पोहतात आणि काही उडणारे प्राणी असतात. काही प्राणी असे आहेत ज्यांच्याबद्दल आपण अनेकदा चर्चा करत राहतो. खरं तर, असाच एक प्राणी म्हणजे वटवाघुळ, जो एका वेगळ्या वैशिष्ट्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्हीही याबद्दल ऐकले असेल, उलट्या लटकण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याच्याबद्दल नेहमी चर्चा होते. बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की, वटवाघूळ नेहमी उलटी लटकलेली का असतात. चला जाणून घेऊया तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर…

वटवाघळं नेहमी उलटी का लटकतात

वटवाघळे सहजपणे उडता यावे म्हणून उलटे लटकून झोपतात. खरं तर, त्यांना जमिनीवरून उडणे कठीण जाते, तर उलटे झोपल्यावर त्यांचे उडणे खूप सोपे होते. वटवाघूळ लहान असल्यामुळे त्यांना उलटे लटकणे सोपे जाते, आणि त्यांचे हृदय जास्त रक्त शरीरात पाठवत नाही, त्यामुळे त्यांना लटकणे सोपे होते. तसेच, वटवाघूळ झोपताना त्यांचे पाय आणि बोटं जागीच पकडून ठेवतात, ज्यामुळे त्यांना लटकून राहण्यासाठी जास्त ऊर्जा खर्चण्याची गरज नसते. 

उलटे झोपूनही वटवाघूळ का पडत नाही

वटवाघूळ जेव्हा झाडावर उलट्या अवस्थेत लटकतात तेव्हा त्यांचे गुडघे हे मागच्या दिशेला असतात. तसेच जेव्हा वटवाघूळ आराम करतात तेव्हा विशेष पद्धतीने ते आपल्या पायांची बोटे आणि पाय बंद करतात. झाडावर लटकत असताना ते ऊर्जेचा वापर करत नाहीत. त्यांच्या पायांची बोटे आणि फांद्या यांच्यात जागा ठेवत नाहीत. त्यावेळी त्यांच्या शरीराचे वजन आणि गुरुत्वाकर्षण शक्ती यामुळे ते झाडावर उलट्या अवस्थेत लटकून राहतात.  त्यांच्या पायांच्या नसा अशा प्रकारे विकसित केलेल्या असतात. त्यांचे वजन त्यांना पंजे घट्ट धरून ठेवण्यास मदत करतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News