फिरायला जाताना गाडीत तुम्हालाही मळमळते का? ‘हे’ उपाय करून बघा

प्रवासात होणारी मोशन सिकनेस किंवा उलटी ही अनेकांना त्रासदायक असते. या लेखात आपण या समस्येची कारणे आणि उपाय जाणून घेऊया.

प्रवासादरम्यान मोशन सिकनेस ही एक सामान्य समस्या आहे. जेव्हा तुम्ही कार, विमान किंवा बसने प्रवास करता तेव्हा अनेकदा मोशन सिकनेस होतो. ही समस्या केवळ मुलांनाच नाही तर प्रौढांनाही भेडसावते. खरंतर मोशन सिकनेस ही एक अशी समस्या आहे. ज्यामध्ये तुमच्या मेंदूला कान, डोळे आणि शरीराच्या इतर भागांकडून काही वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल मिळतात. कधीकधी, त्यामुळे तुम्हाला चक्कर येते. मग कधीकधी उलट्या कराव्याशा वाटतात. जर तुम्हालाही प्रवास करताना ही अडचण येत असेल तर तुम्ही ‘या’ गोष्टी करू शकता.

मोशन सिकनेस का होतो?

मोशन सिकनेस म्हणजे जेव्हा डोळे आणि शरीराचे आंतरिक भाग (उदा. कान) यांच्यात समन्वय नसतो, तेव्हा डोक्यात एक प्रकारची गोंधळ निर्माण होते आणि आपल्याला चक्कर येते, मळमळ येते किंवा उलट्या होऊ लागतात. मोशन सिकनेस अनेक कारणांमुळे होऊ शकतो. आपण एका ठिकाणी बसून असताना गाडी किंवा इतर वाहन वेगाने फिरत असेल, तर डोळ्यांना आणि शरीराच्या आतल्या भागांना वेगळे सिग्नल मिळतात, ज्यामुळे मोशन सिकनेस होतो. 

मोशन सिकनेस टाळण्यासाठी काय करावे?

अदरक

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे तुमच्या शरीराच्या पचनक्रियेत मदत करते. मोशन सिकनेसपासून आराम मिळविण्यासाठी तुम्ही प्रवास करताना आल्याचा वापर करू शकता. प्रवास सुरू होण्यापूर्वी किंवा मळमळल्यास, सुक्या आल्याचे (अदरक) तुकडे खाऊ शकता, जेणेकरून आराम मिळू शकतो. 

पुदिना

पुदिन्याचा सुगंध आणि चव मोशन सिकनेस कमी करण्यासाठी मदत करू शकते. पुदिना आपल्या शरीराला शांत आणि ताजीतवानी ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मोशन सिकनेस कमी होण्यास मदत होते. प्रवास सुरू होण्यापूर्वी किंवा मोशन सिकनेस जाणवू लागल्यावर पुदिन्याची पाने चघळणे.

हवा खेळती ठेवा

प्रवासादरम्यान गाडीच्या खिडक्या उघड्या ठेवा आणि हवा खेळती ठेवा. ज्यामुळे फ्रेश हवा मिळेल. प्रवासात ताजी हवा घेतल्यास मळमळ कमी होऊ शकते.

शांतपणे एका जागी बसून, डोळे मिटून आराम करा

जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळ होत असेल तर शांतपणे एका जागी बसून, डोळे मिटून आराम करणे मदत करू शकते. 

आहार

तेलकट आणि मसालेदार पदार्थांपासून दूर राहा आणि हलका आहार घ्या.प्रवासाला निघण्यापूर्वी तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणे टाळा, कारण ते मळमळ वाढवू शकतात. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News