तुमच्या लक्षात आले आहे का की त्वचेखालील नसा निळ्या किंवा हिरव्या दिसतात, तर रक्ताचा रंग लाल असतो? हे पाहून लोक अनेकदा गोंधळून जातात. रक्ताचा रंग लाल असतो हे सर्वांनाच माहीत आहे, पण शरीरातील नसा ह्या निळ्या, जांभळ्या किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात. यावरून अनेकदा तुम्हालाही प्रश्न पडला असेल की असे का असते? रक्त लाल असते, मग नसा हिरवट-निळ्या का दिसतात? नसा हिरव्या निळ्या का दिसतात जाणून घेऊ…
रक्ताचा रंग
शिरा निळ्या-हिरव्या रंगाच्या दिसण्याचं कारण म्हणजे आपल्या त्वचेतून प्रकाश परावर्तित होण्याची पद्धत आणि रक्ताचा रंग. प्रत्यक्षात रक्त लाल रंगाचं असतं, पण त्वचेमुळे ते निळ्या-हिरव्या रंगाचं दिसतं. जेव्हा प्रकाश आपल्या त्वचेवर पडतो, तेव्हा काही प्रकाश शोषला जातो आणि काही परावर्तित होतो. लाल रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी जास्त असते आणि ती त्वचेत खोलवर प्रवेश करते, तर निळ्या-हिरव्या रंगाच्या प्रकाशाची तरंगलांबी कमी असल्यामुळे ती त्वचेतून परावर्तित होऊन आपल्याला दिसते.

त्वचेचा परिणाम
आपल्या त्वचेच्या खाली असलेल्या शिरा (रक्तावाहिन्या) लाल रंगाच्या रक्तामुळे लाल दिसण्याऐवजी निळ्या किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात, कारण त्वचेतून परावर्तित होणारा निळा-हिरवा प्रकाश आपल्याला दिसतो. त्वचेचा रंग आणि जाडी देखील शिरा कशा दिसतात यावर परिणाम करतात. फिकट रंगाच्या त्वचेमध्ये शिरा अधिक स्पष्ट दिसू शकतात, तर गडद रंगाच्या त्वचेमध्ये त्या कमी दिसू शकतात.
रक्त आणि ऑक्सिजन
तरंगलांबी
हिमोग्लोबिन
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)