कोण भरत गोगावले? मी नाही ओळखत, ठाकरे बंधू एकत्र आल्याने कोणाला फरक पडत नाही, नारायण राणे काय म्हणाले?

बाळासाहेब ठाकरेंनी 48 वर्षात शिवसेनेत जे कमावली होते, ते अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी साफ केले. उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्वशून्य माणूस आहे. आणि त्याला कुठल्याही मराठी भाषेबद्दल किंवा मराठी माणसावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

Narayan Rane – मंत्री भरत भोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा नारायण राणे यांनी समाचार घेतला. तसेच दोन ठाकरे बंधू जरी एकत्र आले तरी कुणाला काय फरक पडणार नाही. महाराष्ट्राला काही फरक पडणार नाही. असं म्हणत नारायण राणे यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. आज ते पावसाळी आधिवेशात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मी त्यांना ओळखत नाही…

दुसरीकडे मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणेबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना नारायण राणे यांनी मारामाऱ्या केल्या आहेत… कोर्टात केले आहेत… भानगडी केल्या….म्हणून ते एवढे सारे करून तेवढ्या उंचीवर पोचले आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री भरत भोगावले यांनी केलं होतं. याबाबत नारायण विचारला असता, कोण भरत भोगावले? मी त्यांना ओळखत नाही, असा टोला नारायण राणे यांनी मंत्री भरत गोगावले यांना लगावला आहे.

म्हणून त्यांना राज ठाकरेंची गरज…

आता दोन भावाना एकमेकांची गरज आहे म्हणून एकत्र येत आहेत. पण यांनी लोकांना काही फरक पडणार नाही. आता उद्धव ठाकरे यांचं अस्तित्वासाठी ते संघर्ष करत आहे. मग भावावरती खरं प्रेम असेल तर मातोश्रीमधील अर्धा भाग त्यांनी राज ठाकरेंना द्यावा, असेही यावेळा नारायण राणे यांनी म्हटले. आता हिंदी सक्तीबद्दल उद्धव ठाकरे आणि विजयी सभा घेणार आहेत. पण अहो कशली सभा. उद्धव ठाकरे यांचा पक्ष संपत आहे, म्हणून ते आता भावाला जवळ करत आहेत. पण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव यांच्याकडे डुप्प्लिकेट सेना आहे. असं राणे म्हणाले.

अडीच वर्षात काय केले…

मुख्यमंत्री असताना केवळ दोन वेळा मंत्रालयात आले होता. असा मुख्यमंत्री असू शकते का? ना मराठी माणसासाठी… मराठी तरुणांसाठी पोटापाण्याची किंवा रोजगाराचे काही केले का? आणि आता मराठी मराठी म्हणून ओरडत आहे, असं टीकास्त्र नारायण राणे आणि उद्धव ठाकरेवर केलं. हिंदी सक्ती भाषेचा जीआर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांनी असताना आणला होता, आणि आता सरकारच्या नावाने ओरडत आहेत. मग मुळात त्यांनी हा जीआर सुरुवातीला का स्वीकारला? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.


About Author

Astha Sutar

Other Latest News