फेसबुकवर फक्त फॉलोअर्स असून पैसे मिळतात का? जाणून घ्या कमाईची खरी सूत्रं

डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचं साधन राहिलेलं नाही, तर अनेकांसाठी उत्पन्नाचं एक महत्त्वाचं साधन बनलं आहे. त्यातही Facebook हा जगातील सर्वात जुना आणि मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता कंटेंट क्रिएटर्सना कमाईची संधी देतो. मात्र, लोकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो, किती फॉलोअर्स असले की पैसे मिळायला लागतात? फक्त 1000 फॉलोअर्स असले तरी पैसे मिळतात का? चला, याचा सविस्तर आढावा घेऊया.

Facebook वर मोनेटायझेशन कसं सुरू होतं?

Facebook चं मोनेटायझेशन Meta for Creators प्रोग्राम अंतर्गत कार्यरत आहे. यात कंटेंट क्रिएटर्सना विविध प्रकारे कमाई करण्याची संधी मिळते.

  • In-stream Ads (व्हिडिओदरम्यान येणाऱ्या जाहिराती)

  • Fan Subscriptions (मासिक सदस्यता)

  • Branded Content (ब्रँडसोबत भागीदारी)

  • Reels Bonus Program (Facebook Reels साठी बोनस)

मोनेटायझेशनसाठी आवश्यक अटी

जर तुम्ही Facebook वर नियमित व्हिडीओ कंटेंट शेअर करत असाल, तर तुम्ही in-stream ads द्वारे कमाई करू शकता. मात्र त्यासाठी काही अटी पूर्ण करणं गरजेचं आहे.

  1. किमान 10,000 फॉलोअर्स पेजवर असावेत.

  2. मागील 60 दिवसांत किमान 60,000 मिनिटांचा व्हिडीओ वॉच टाइम असावा.

  3. सर्व कंटेंट Facebook च्या कम्युनिटी स्टँडर्ड्स आणि मोनेटायझेशन पॉलिसीच्या अधीन असावा.

फक्त 1000 फॉलोअर्स असून पैसे मिळतात का?

थोडक्यात उत्तर, नाही. Facebook फक्त फॉलोअर्सच्या आधारावर पैसे देत नाही. फक्त 1000 फॉलोअर्स असूनही तुम्ही थेट मोनेटायझेशनमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मात्र, जर तुमचं कंटेंट दर्जेदार असेल, व्ह्यूज भरपूर मिळत असतील, तर तुम्ही ब्रँड स्पॉन्सरशिपद्वारे कमाई करू शकता.

Reels Bonus Program

Meta ने निवडक क्रिएटर्ससाठी Reels Bonus Program सुरू केलं आहे. यात भाग घेण्यासाठी,

  • Facebook स्वतः इन्वाइट करतं.

  • प्रत्येकालाच या प्रोग्राममध्ये प्रवेश मिळेलच असं नाही.

  • Reels चा परफॉर्मन्स चांगला असेल तर महिन्याला बोनस दिला जातो.

Fan Subscriptions – लॉयल ऑडियन्ससाठी

Fan Subscriptions हे देखील एक कमाईचं साधन आहे. जर तुमच्याकडे विश्वासू आणि नियमित ऑडियन्स असेल, तर तुम्ही,

  • एक्सक्लूसिव कंटेंट देऊन

  • त्यांच्याकडून मासिक शुल्क (सब्स्क्रिप्शन) घेऊ शकता.

फक्त फॉलोअर्स पुरेसे नाहीत

फेसबुकवर पैसे कमवायचे असतील, तर फक्त फॉलोअर्स वाढवणं पुरेसं नाही. त्यासाठी तुम्हाला:

  • दर्जेदार आणि सातत्यपूर्ण कंटेंट तयार करावा लागेल

  • ऑडियन्सशी चांगलं कनेक्शन ठेवलं पाहिजे

  • Facebook च्या सर्व धोरणांचं पालन करणं आवश्यक आहे

जर हे सर्व पद्धतशीरपणे केलं, तर Facebook हे तुमचं कमाईचं स्थिर आणि दीर्घकालीन व्यासपीठ बनू शकतं.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News