तुमच्याही स्तनांमध्ये वेदना होतात का? ‘ही’ कारणे असू शकतात

स्तन दुखीची कारणे अनेक असू शकतात, त्यामुळे डॉक्टरांनी योग्य तपासणी करून निदान करणे आवश्यक आहे, जेणेकरून योग्य उपचार करता येतील.

महिला आणि मुलींमध्ये स्तनदुखी ही एक सामान्य समस्या आहे. पण कधीकधी स्तन दुखणे हे अनेक आरोग्य समस्यांचे लक्षण देखील असू शकते. जर तुम्हालाही ही वेदना सतत होत असेल तर काळजी घ्या. आज आम्ही तुम्हाला स्तन दुखण्याची कारणे काय असू शकतात ते सांगणार आहोत. 

हार्मोनल बदल

जेव्हा शरीरातील हार्मोन्स असंतुलित असतात तेव्हा बऱ्याचदा ते स्तनदुखीची समस्या निर्माण करतात. यामुळे मुली आणि महिलांना अनेकदा वेदना सहन कराव्या लागतात. स्त्रियांच्या स्तनांमध्ये वेदना अनेकदा हार्मोनल बदलांमुळे होतात, खासकरून मासिक पाळीच्या वेळी. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या स्तरांमध्ये वाढ होते, ज्यामुळे स्तनदुखी होऊ शकते.

स्तनामध्ये गाठ तयार झाल्यास

बऱ्याचदा महिलांना त्यांच्या स्तनांमध्ये वेदना कशामुळे होत आहेत हे कळत नाही. कारण हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. गाठ तयार झाल्यामुळे अनेकांना स्तनात वेदना येणे यासारख्या समस्या येऊ शकतात. स्तनामध्ये गाठ तयार झाल्यास, ती वेदनादायक असू शकते. स्तनाच्या कर्करोगामुळे स्तनामध्ये गाठ येऊ शकते, आणि वेदना देखील होऊ शकतात. गाठ सौम्य किंवा घातक असू शकते, त्यामुळे डॉक्टरांकडून तपासणी करणे आवश्यक आहे. 

स्तनाचा संसर्ग

स्तन दुखीचे अनेक कारण असू शकतात, आणि स्तन संसर्ग देखील त्यापैकी एक आहे. स्तन संसर्ग झाल्यास, स्तनांमध्ये वेदना, लालसरपणा, सूज आणि स्पर्श करतांना ताप येणे यासारखी लक्षणे दिसू शकतात.

मासिक पाळी

स्त्रियांच्या स्तनांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान वेदना होणे एक सामान्य गोष्ट आहे. मासिक पाळीच्या दरम्यान शरीरात होणारे हार्मोनल बदल, विशेषतः एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरोन, स्तनांमध्ये सूज आणि वेदना निर्माण करू शकतात. मासिक पाळीच्या दरम्यान शरीरात होणारे बदल आणि वेदना स्तनांमध्ये जाणवू शकतात. मासिक पाळीच्या दरम्यान हार्मोनल बदलांमुळे स्तनात वेदना होऊ शकतात. 

स्तनदुखीची अनेक कारणं असू शकतात. यात स्तनपान, गर्भधारणा, स्तनाचा कर्करोग, स्तनाचा संसर्ग किंवा काही वैद्यकीय समस्या. म्हणून, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News