चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती कशी वाढवू शकता? जाणून घ्या…

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे नैसर्गिक मार्ग जाणून घ्या...

प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापन यांसारख्या जीवनशैलीतील बदलांची आवश्यकता असते. काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकतो.

तुळस

रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पानं रोज चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्गाला अटकाव होतो.

तूप

कोणत्याही वयोमानात शरीराचं पोषण करायचं असेल तर अर्धाचमचा तूप आवर्जुन खावं. तुपामुळे शरीराला वंगण मिळतं. तुपातील चरबी आणि तेल शरीरास आवश्यक ऊर्जा पुरवतात, तसेच ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. 

लिंबू

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्त्वं असतं. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो.

आवळा

प्रामुख्यानं हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.

नाचणी सत्वं

दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचं सत्त्व हवंच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्त्वं असतात. हे नाचणी सत्त्वं दिवसातून एकदा तरी शरीरात जाणं आवश्यक असतं.

बीट

रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तीवर्धक आहे त्यामुळे वृध्दांच्या आहारात तर बीटाचा समावेश असायलाच हवा.

आनंदी राहणे

सकारात्मक दृष्टिकोन आणि हसून आनंदी राहणे देखील तणाव कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News