वास्तुशास्त्रानुसार, घरात लावलेले चित्र केवळ सजावटीचा भाग नसून ते आपल्या जीवनावरही परिणाम करू शकतात. योग्य दिशेने लावलेले सकारात्मक चित्र घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतात. चुकीच्या दिशेने किंवा नकारात्मक भावनांसह लावलेले चित्र घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात आणि जीवनात समस्या आणू शकतात. म्हणून, घरात चित्रे लावताना वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे.
वाहत्या पाण्याचे चित्र
बरेच लोक नकळतपणे त्यांच्या घरात समुद्राचे फोटो लावतात, जे वास्तुनुसार शुभ मानले जात नाही. विशेषतः जर तुमच्या कुटुंबाच्या फोटोमध्ये वाहते पाणी दिसत असेल तर ते आर्थिक नुकसानाचे लक्षण असू शकते. वास्तुशास्त्रानुसार, वाहते पाणी हे संपत्तीच्या प्रवाहाचे प्रतीक आहे. म्हणून, घरात असे फोटो लावणे टाळा कारण त्यामुळे तुमच्या घरातून संपत्तीची गळती होऊ शकते.

मावळत्या सूर्याचे चित्र
घराच्या सजावटीसाठी आपण अनेकदा अशी चित्रे निवडतो जी आपल्याला आनंददायी वाटतात, जसे की समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त किंवा पर्वतांचे विहंगम दृश्य. पण वास्तुशास्त्रानुसार, अशी चित्रे डोळ्यांना आनंददायी असू शकतात. पण घरात असे चित्र शुभ मानले जात नाही. हे फोटो पाहून मनात निराशा आणि दुःखाची एक विचित्र भावना निर्माण होते, ज्यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होऊ शकते. म्हणून, घराच्या सजावटीसाठी अशी चित्रे टाळावीत आणि सकारात्मक ऊर्जा असलेल्या चित्रांचा वापर करावा. सूर्यास्त म्हणजे एका गोष्टीचा अस्त होणे, या चित्रांमुळे घरात दारिद्र्य येऊ शकते, असे काहीजण मानतात.
महाभारतातील युद्ध किंवा हिंसा दर्शवणारे फोटो
महाभारताचे चित्र लावणे आणि महाभारत घरामध्ये ठेवणे अशुभ मानले जाते. ही चित्रे लावल्याने घरात कलह आणि भांडणे वाढतात. युद्धाचा कोणताही फोटो घरात ठेवल्याने कुटुंबात परस्पर मतभेद होतात आणि कौटुंबिक एकोपा कमी होतो. अशा प्रकारच्या चित्रांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. बेडरूममध्ये कधीही हिंसंक दृष्य, लढाई, भांडणं यांचे फोटो लावू नये.त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणं होण्याची शक्यता असते असं मानलं जातं. युद्ध हे नेहमीच विनाशाचे प्रतीक असते. म्हणून अशी चित्रे किंवा मूर्ती केवळ त्रास आणि मानसिक तणाव निर्माण करतात.