वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना दिशांना खूप महत्त्व आहे. घराच्या प्रत्येक भागाचे स्वतःचे महत्त्व असते आणि बाथरूमही त्याला अपवाद नाही. वास्तुमध्ये, बाथरूमला असे स्थान मानले जाते जिथे सतत उर्जेचा प्रवाह असतो. ही ऊर्जा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही स्वरूपात असू शकते. आज आपण बाथरूम बद्दल बोलणार आहोत. बाथरूम कोणत्या दिशेला असावे आणि नवीन घरात बाथरूम बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.
बाथरूमचा दरवाजा कोणत्या दिशेला असावा?
ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुमध्ये बाथरूमचा दरवाजा महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण हा दरवाजाच ऊर्जेचा प्रवाह नियंत्रित करतो. जर दरवाजा चुकीच्या दिशेला असला तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकते, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि घराच्या वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो. घरात सकारात्मक उर्जेसाठी बाथरूमची दिशा महत्त्वाची असते. उत्तर किंवा वायव्य दिशेला बांधलेले बाथरूम चांगले मानले जाते कारण ते नकारात्मकता कमी करते आणि सकारात्मकता वाढवते.

बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे का आवश्यक आहे
काही लोकांची ही सवय असते की, जेव्हा ते बाथरूममधून बाहेर पडतात तेव्हा ते दार उघडे ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार हा सर्वात मोठा दोष मानला जातो. जर तुम्हीही हे करत असाल, तर आता ही सवय सुधारा. बाथरूमचा दरवाजा उघडा असल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर येते. मानले जाते की ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या कामात अडथळे निर्माण करते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)