Bridal Glow Drink: लग्नात चमकदार चेहरा हवाय? आजच प्यायला सुरु करा ‘हे’ स्पेशल ड्रिंक

Remedies for Bridal Glow: लग्नात चंद्रासारखा चमकेल चेहरा? आजच प्यायला सुरु करा 'हे' स्पेशल ड्रिंक

Home Remedies for Glowing Face at Wedding:  उन्हाळा येताच आता लगीनसराई सुरु झाली आहे. त्यामुळे नवरीमुलींची घाईगडबडदेखील सुरु झाली आहे. नवऱ्या मुलींना कपड्यांपासून त्वचेपर्यंत अनेक गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यावे लागते. ज्यामध्ये अनेक मुली त्यांच्या त्वचेच्या समस्यांमुळे चिंतेत राहतात. अशा परिस्थितीत, जर तुमचे लग्नही लवकरच होणार असेल, तर अजिबात काळजी करू नका. कारण आज आम्ही तुम्हाला अशा ज्यूसबद्दल सांगणार आहोत, जो लग्नाच्या ७ दिवस आधी प्यायल्यास तुमच्या चेहऱ्यावर चंद्रासारखे तेज आणि चमक येईल. चला तर मग पाहूया हे उपाय नक्की काय आहेत.

 

गाजर आणि बीटचा रस-

लग्नाच्या एक आठवड्या आधी गाजर आणि बीटचा रस पिण्यास सुरुवात करा. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. जे तुमच्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्यायल्याने ७ दिवसांत पिंपल्स नाहीसे होऊ शकतात. याशिवाय, ते त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी देखील उपयुक्त ठरते. जर तुम्हालाही तुमचा चेहरा गुलाबी आणि चमकदार बनवायचा असेल तर हा रस पिण्यास सुरुवात करा.

 

उसाचा रस-

उसाच्या रसात असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे ते त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. पण जेव्हा त्यात व्हिटॅमिन सी देखील मिसळले जाते तेव्हा ते कोलॅजनचे उत्पादन वाढविण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचा अधिक मजबूत आणि चमकदार दिसू लागते.

 

आवळ्याचा रस-

लग्नापूर्वी चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याचा रस घेऊ शकता. त्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जे तुमच्या चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आणि चेहऱ्याचा रंग एकसारखा करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यासाठी लग्नाच्या ७ दिवस आधीपासून आवळ्याचा रस पिण्यास सुरुवात करावी.

 

काकडी आणि टरबूज-

उन्हाळ्यात काहींची त्वचा खूप तेलकट दिसते. जर तुमचे लग्न लवकरच होणार असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. यासाठी लग्नाच्या ७ दिवस आधी काकडी आणि टरबूजाचा रस पिण्यास सुरुवात करावी. हे तुमची त्वचा बराच काळ हायड्रेट ठेवते. हे चेहऱ्यावर घाम येण्यापासून देखील रोखते. त्यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होणार नाही.

 

(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News