अनेकजण जेवणानंतर तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून बडीशेप खातात. बडीशेप फक्त माऊथ फ्रेशनरचे काम करत नाही तर ती शरीराच्या अनेक समस्यांवर पण उपचार करते. बडीशेपचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. भारतीय आयुर्वेदिक औषधांमध्ये बऱ्याच काळापासून वापरले जात आहे. बडीशेपमध्ये अनेक पोषक तत्वे असतात, ज्यामुळे पचन सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते, आणि अनेक आजार दूर होण्यास मदत करते. बडीशेपमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात.
पचन सुधारते
बडीशेपच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचन प्रक्रिया सुरळीत करते. हे अपचन, गॅस आणि पोट फुगणे यासारख्या समस्या कमी करण्यास मदत करते. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने आम्लपित्त आणि अपचन कमी होते.

वजन कमी करण्यास मदत करते
दृष्टी सुधारते
बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते. बडीशेपचे नियमित सेवन केल्याने मोतीबिंदू आणि डोळ्यांशी संबंधित इतर समस्या टाळता येतात.
खोकला आणि सर्दीपासून आराम
जर तुम्हाला खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेप आणि साखर खावी. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात.
त्वचेसाठी फायदेशीर
बडीशेपमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतात. याच्या सेवनाने त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि मुरुमे, सुरकुत्या यासारख्या समस्या दूर होतात.
हृदयविकार टाळण्यास मदत करते
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)