बीट हे आरोग्यासाठी खूपच फायद्याचे आहे. यात अनेक पोषक तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. बीटाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार आणि सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्व भरपूर असतात. बीट हे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्यांवर गुणकारी आहे. जसे की उच्च रक्तदाब, मधुमेह, स्मरणशक्ती, इत्यादी. बीटमध्ये आणखी काय काय गुणधर्म आहेत ज्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.
बीटाचे आरोग्यासाठी फायदे
रक्तदाब नियंत्रणात ठेवतो
बीटमध्ये नायट्रेट्स असतात. नायट्रेट संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह सुरळीत करण्याचं काम करतं. नायट्रेट हे शरीरात जाऊन नायट्रिक ॲक्साइडमध्ये रुपांतरीत होतं. नायट्रिक ॲक्साइड रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

हृदयविकाराचा धोका कमी करतो
बीट हृदयासाठी खूप लाभदायक ठरू शकते. बीटमध्ये नायट्रेट्स आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी होतो आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. बीटमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात.
मेंदू तल्लख होतो
नायट्रेटमुळे मानसिक आरोग्य आणि आकलनशक्ती मजबूत होते. बीटरूट नायट्रेट्सने समृद्ध आहे, त्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये सुधारणा करण्यासोबत रक्त प्रवाह वाढवतो. बीटचे नियमित सेवन केल्याने मेंदूची स्मरणशक्तीही सुधारते.
त्वचा तजेलदार दिसू लागते
बीटमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे असतात, जे त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवतात, तसेच केसांची वाढ सुधारतात.
अशक्तपणा कमी होतो
बीटमध्ये असलेलं लोहाचं प्रमाण अशक्तपणावर मात करतं. लोह या खानिजामुळे हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढून अशक्तपणा कमी होतो. बीटामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे शरीरातील पोटॅशियमची कमतरता दूर करते. पोटॅशियम अभावी शरीरात थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात. बीट खाल्ल्याने आपल्या शरीरातील थकवा दुर होण्यास मदत होते. अशक्तपणा असणाऱ्या लोकांनी दररोज बीट खाणे आरोग्यासाठी चांगले आहे.
वजन कमी करण्यासाठी उत्तम
बीटमध्ये कमी कॅलरीज असतात, तसेच शून्य फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये बीटचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट खाण्यामुळे वजन वाढत नाही, तसेच त्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते..
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)