Mumbai : जर तुम्ही रिक्षा टॅक्सी किंवा कॅब बुक करून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपण प्रवास करत असताना अनेक वेळा कॅब बुक केल्यानंतर जवळचे भाडे चालक नाकारतो. किंवा जास्त पैसे मिळत नसल्यामुळे बुक केल्यानंतरही तो भाडे नाकारतो. मात्र असे भाडे चालकाने नाकारल्यास त्याला दंडाला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत राज्य शासनाने वाहतूक सेवेसाठी एकत्रित अॅप आधारित (अॅग्रीगेटर) धोरण जाहीर केले आहे. त्यात दंडाची तरतूद केली आहे.
किती दंड असणार?
दरम्यान, कित्येक वेळा मोबाइल अॅपवरून कॅब बुक केल्यानंतरही जवळचे भाडे किंवा अपेक्षित पैसे न मिळल्यास कॅब चालक बुकिंग रद्द करतात. तर काहीवेळा प्रवाशांना बुकिंग रद्द करण्यासाठी चालक भाग पडतात. परंतु आता असे प्रकार घडल्यास चालकाला दंड होणार आहे असे राज्य सरकारने नवीन धोरण आणले आहे चालकाने विनाकारण भाडे रद्द केल्यास.

चालकास भाड्यातून दहा टक्के रक्कम किंवा शंभर रुपये पर्यंत दंड होऊ शकतो. हा दंड बुकिंग करणाऱ्या ग्राहकाच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. तसेच ग्राहकानेही कारण न देता फेरी रद्द केल्यास प्रवाशालाही ५० रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. किंवा भाड्याच्या रकमेतून पाच टक्के रक्कम कापली जाणार आहे, असं राज्य शासनाने धोरणात म्हटले आहे.
महिला सुरक्षेवर भर देण्यात येणार…
दुसरीकडे नवीन धोरणात महिला प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. चालकांनी आपत्कालीन संपर्क सुविधा पुरवणेदेखील बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच नवीन धोरणानुसार अॅपआधारित सेवेसाठी वाहनांचे रिअल टाइम ट्रॅकिंग अनिवार्य करण्यात आले आहे. महिला प्रवाशांसाठी प्रवासात सर्वोच्च सुरक्षितता राखण्यासाठी महत्व दिले जाणार आहे.
सहप्रवासासाठी केवळ महिला चालक किंवा महिला सहप्रवासी निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यासोबतच चालक परवाना नूतनीकरण, प्रसंगी अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण प्राप्त करणे बंधनकारक असणार आहे. चालकाच्या चारित्र्याची आणि पार्श्वभूमीची पडताळणी, चालक आणि सहप्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमा संरक्षण आवश्यक असेल.