Mansoon – पावसाने मान्सूनच्या आधीच मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे पावसात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. पण सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास दक्ष रहावे, अश्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज…
दरम्यान, आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे, आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. त्यासाठीची कार्यपद्धती योग्य रित्या राबवावी. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. यंदाच्या मान्सूनच्या काळात जीवित आणि मालमत्तेचे कमीक कमी नुकसान होईल अशा प्रकारे काम करावे. आपत्तीच्या काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून 24 तास व शनिवार रविवारी ही दक्ष राहून काम करावे.

आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा, आणि आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्रालयात मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात…
दुसरीकडे राज्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या घटनांचा विचार करता मॅपिंगमध्ये नसलेल्या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये यंदा 110 ते 119 टक्के पावसाचा आंदाज आहे. जास्ती पावसाचा अंदाज पाहता सांगली आणि कोल्हापूर महानगर पालिकांनी विशेष तयारी ठेवावी. राज्यातील सर्वच महानगरपालिकांनी फ्लॅश फ्लडसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा.
दरड कोसळण्याच्या जागी तातडीने सुरक्षा उपाय योजना कराव्यात. यात जिल्हाधिकारी यांनी प्रामुख्याने लक्ष घालावे. मुंबईत दरड प्रवण अशी एकूण 249 ठिकाणे आहेत. याबाबत सर्वच संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. आपत्तीकाळात बचावकार्यासाठी पुरवण्यात आलेल्या साहित्याचे मॉकड्रिल घ्यावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.