वीजांमुळे जाणारे बळी; बोल्ड अरेस्टर तंत्रज्ञान वाचवू शकते जीव, नेमकं कसं?

वीजेचा अटकाव करणारी ‘बोल्ट अरेस्टर’ उपकरणे पावसाच्या दिवसांत अत्यंत गरजेची असतात. हे तंत्रज्ञान अनेकांचा जीव वाचवू शकते, नेमकं कसं ते जाणून घेऊ...

राज्यात अवकाळी पावसामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे, गेल्या दोन दिवसांत जवळपास 20 लोकांनी अंगावर वीज कोसळल्याने जीव गमावला आहे. परंतु बोल्ड अरेस्टर उपकरणांच्या मदतीने हे होणारे मृत्यू रोखता येऊ शकतात. नेमकं हे तंत्रज्ञान कसं उपयोगी आहे? ते कसे काम करते याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊ…

नेमकं काय तंत्रज्ञान?

बोल्ड अरेस्टर लाइटनिंग तंत्रज्ञान हे विजेपासून होणाऱ्या हानिकारक प्रभावापासून संरक्षक म्हणून वापरले जाते. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने उंच इमारती, औद्योगिक प्रकल्प, सबस्टेशन, वीज केंद्रे, टेलिकॉम टॉवर्स, तसेच घरगुती वापरासाठी वापरले जाते. वीज कोसळल्यावर ती थेट संरचनेवर पडण्याऐवजी बोल्ड अरेस्टरद्वारे सुरक्षितपणे जमिनीत उतरवली जाते, त्यामुळे जीविताचे नुकसान टळते. बोल्ड अरेस्टर विजेच्या अति दाबाला प्रतिसाद देऊन वीजेचा प्रवाह जमिनीकडे वळवतो आणि यंत्रणेला वाचवतो. हे उपकरण विद्युत सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानले जाते. विजेच्या धक्क्यामुळे निर्माण होणारी आग, उपकरणांचे बिघाड, मानवहानी व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते.

मराठवाड्यात उपकरणांची अधिक गरज

मराठवाड्यात एकूण 403 बोल्ट अरेस्टर उपकरणे बसवली आहेत. अनुक्रमे छत्रपती संभाजीनगरात 75, जालना 3, परभणी 4,हिंगोलीत 2, नांदेडात 4, बीडमध्ये 308, लातूरात 3 आणि धाराशिवमध्ये 4 बोल्ट अरेस्टर बसवले आहेत. या उपकरणांची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात आलेल्या अहवालात साल 2024 च्या मान्सून पूर्व बैठक झाली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात किमान 100 बोल्ट अरेस्टर उपकरणे बसविण्याचे आदेश दिले.परंतू एकाही जिल्ह्याने या उपकरणाच्या खरेदीसाठी प्रस्ताव पाठवला नाही. आता याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होताना दिसत आहे.

वीजांपासून असे करा संरक्षण

आकाशात विजा चमकत असताना सुरक्षितता राखणे अत्यंत आवश्यक असते. अशावेळी उघड्यावर किंवा झाडाखाली थांबू नये. उंच वस्तूंपासून, लोखंडी खांबांपासून आणि विद्युत उपकरणांपासून दूर रहावे. शक्य असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आसरा घ्यावा. पावसात भिजत चालणे टाळावे. पाण्यातून चालणे किंवा पोहणे धोकादायक असते. मोबाईल, टीव्ही किंवा वायर असलेली उपकरणे वापरणे टाळावे. घरात असताना विजेची मुख्य स्विच बंद करावी. वाहनात असाल तर गाडी बंद करून आतच थांबावे. या सर्व उपायांमुळे आकाशातील विजेपासून जीव वाचवणे शक्य होते. सुरक्षितता पाळणे हीच सर्वोत्तम काळजी होय.


About Author

Rohit Shinde

Other Latest News