दिशा पटानी हॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार; प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात करणार धमाल

दिशा पाटनीने २०१५ साली तेलुगु चित्रपट लोफर मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१६ मध्ये एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Disha Patani ; बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी आता हॉलीवूडमध्ये पाऊल टाकणार आहे. ती ऑस्कर विजेता दिग्दर्शक केविन स्पेसी यांच्या “होलीगार्ड्स” या चित्रपटातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ही एक सुपरनॅचरल ॲक्शन-थ्रिलर फिल्म असून ती मेक्सिकोमध्ये शूट करण्यात आली आहे आणि त्यामध्ये अनेक मोठे आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी आहेत.

होलीगार्ड्स”ची कथा आणि कलाकार

“होलीगार्ड्स” ही एक सुपरनॅचरल ॲक्शन-थ्रिलर फिल्म आहे, जी “स्टॅटिगार्ड्स वर्सेस होलीगार्ड्स” या फ्रँचायझीचा भाग आहे. या चित्रपटात दिशासोबत हॉलीवूडचे प्रसिद्ध कलाकार डॉल्फ लुंडग्रेन (रॉकी IV, द एक्सपेंडेबल्स), टायरेस गिब्सन (फास्ट अँड फ्यूरियस) आणि ब्रियाना हिल्डेब्रांड (डेडपूल, लूसिफर) झळकणार आहेत.

या चित्रपटाचे चित्रीकरण मेक्सिकोतील डुरंगो येथे झाले होते आणि त्याचा ट्रेलर २०२५ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. एका सूत्राने सांगितले की, “दिशा जानेवारीमध्ये डुरंगोमध्ये शूटिंग करत होती. तिचे सीन्स अद्भुत आहेत आणि चाहत्यांना एक मोठे आश्चर्य मिळणार आहे.”

दिशा पाटनीचा फिल्मी प्रवास

दिशा पाटनीने २०१५ साली तेलुगु चित्रपट लोफर मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. २०१६ मध्ये एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती कुंग फू योगा (२०१७) मध्ये जॅकी चॅनसोबत, बागी २ (२०१८), भारत (२०१९), मलंग (२०२०), कल्कि यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. २०१९ मध्ये दिशा फोर्ब्स इंडिया सेलेब्रिटी १०० यादीतही सामील झाली होती. दिशा उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे. तिचे वडील पोलीस अधिकारी आहेत आणि तिची मोठी बहिण खुशबू भारतीय सैन्यात लेफ्टनंट आहे.

फॅन्समध्ये उत्सुकता वाढली
दिशाची एक बीटीएस (बिहाइंड-द-सीन) फोटो अलीकडेच व्हायरल झाली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. भारतात ती वेलकम टू द जंगल या चित्रपटात दिसणार आहे, जो २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त आणि रवीना टंडन यांसारखे दिग्गज कलाकारही असतील. दिशाचे हॉलीवूड पदार्पण हे भारतीय सिनेसृष्टीसाठी अभिमानाची गोष्ट आहे.


About Author

Rohit Jernavare

Other Latest News