चालत्या ट्रेनमध्ये सीटवरुन वाद, 15 जणांच्या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू

बागपतच्या आधी 10 किमी अंतरावर असलेल्या खेकडा स्टेशनवर ट्रेन थांबली तेव्हा मारहाण करणारे आरोपी पळून गेले. ट्रेनमध्ये या तरुणासोबत प्रवास करणाऱ्या एका तरुणानं घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबाला आणि रेल्वे पोलिसांना दिली.

बागपत– दिवसेंदिवस ट्रेनमधून प्रवास करणं जिकरीचं होतत चाललं आहे, याचं उदाहरण देणारी घटना उत्तर पर्दएशात बादपतमध्ये घडलीय. चालत्या ट्रेनमध्ये बसायच्या जागेवरुन झालेल्या वादात एका तरुणाचा मारहाणीत मृत्यू झालाय. हा तरुण सहारनपूर दिल्ली पॅ2सेंजर ट्रेनमधून बागपतला येत होता. फरखपूर स्टेशनवर गाडी आली असताना सीटवरुन वाद झाला त्यानंतर 15 ते 20 जणांनी त्याला लाथा बुक्क्यांनी आणि कमरेच्या पट्ट्यानं जबर मारहाण केली.

बागपतच्या आधी 10 किमी अंतरावर असलेल्या खेकडा स्टेशनवर ट्रेन थांबली तेव्हा मारहाण करणारे आरोपी पळून गेले. ट्रेनमध्ये या तरुणासोबत प्रवास करणाऱ्या एका तरुणानं घडलेल्या प्रकाराची माहिती कुटुंबाला आणि रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तिथंत्याला मृत घोषित करण्यात आलं.

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर

दीपक असं या मृत तरुणाचं नाव असून तो दिल्लीत नोकरीला होता. दर शुक्रवारी तो दिल्लीहून बागपतला आपल्या घरी सुट्टीसाठी येत असे. शुक्रवारी परतीच्या प्रवासात दीपकचा मृत्यू झाला, मात्र याघटनेचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाल्यानंतर याची चर्चा झाली. दोन दिवसांपूर्वी झाशीमध्ये वंदे भारत एक्सप्रेसमध्येही अशीच मारहाण झाली होती.

दीपकच्या कुटुंबावर शोककळा

दीपक हा दिल्लीतल एका फॅक्टरीत नोकरीला होता. 12 वर्षआंपूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्याला दोन मुलंही आहेत. यात 11 वर्षांची मुलगी आणिअडीच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. दीपक गेल्या 15 वर्षांपासून दिल्लीत नोकरी करत होता. दीपक प्रवासात एकटा असल्यानं त्याला टार्गेट करुन मारहाण करण्यात आल्याचा आरोप आता त्याच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येतोय. आता या प्रकरणात आरोपी हे एखाद्या गँगशी संबंधित असल्याचा आरोपही करण्यात येतोय. पोलीस सध्या या घटनेनंतर आरोपींचा शोध घेतायेत.

ट्रेनमध्ये  असा प्रकार घडला असला तरी मुंबईत लोकलमध्ये असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. उन्हा-पावसात जिकरीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची  लाट उसळलेली दिसते. याचा  रोष सरकारवर व्यक्त न होता अशा  स्वरुपात तो  उद्रेक बाहेर पडताना दिसतोय.


About Author

Smita Gangurde

Other Latest News