आषाढी वारी केव्हा सुरु होतेय? जाणून घ्या वारीचे वेळापत्रक

पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे धार्मिक शहर आहे आणि ते विठ्ठलाचे निवासस्थान मानले जाते. आषाढी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते आणि लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.

आषाढी वारी ही महाराष्ट्राची एक मोठी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीमध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून वारकरी पंढरपूर येथे पायी चालत जातात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आणि भक्तीभावाने ही यात्रा काढली जाते. वारीमध्ये भजन, कीर्तन, अभंग आणि विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी पंढरपूरकडे वाटचाल करतात. यंदा वारी केव्हा आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. पाहुयात आषाढी वारीची सुरुवात केव्हा होणार…

आषाढी एकादशी केव्हा आहे ?

आषाढी एकादशी ६ जुलै 2025, रविवार रोजी आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायात खूप महत्त्व आहे. या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो लोक पायी वारी काढतात. 

आषाढी वारी केव्हा सुरु होणार ?

आषाढी वारी १८ आणि 19 जून 2025 रोजी सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जूनला देहूहून प्रस्थान करेल, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जूनला आळंदीतून प्रस्थान करेल. दोन्ही पालख्या पंढरपूरला आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी पोहोचतील.

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025

आषाढी वारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025, दिनांक 19 जून रोजी रात्री 8 वाजता आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

19 जून आळंदीहून पालखी प्रस्थान, 20 जून आळंदी ते पुणे (२९ कि.मी.), 21 जून पुणे मुक्काम, 22 जून  पुणे ते सासवड (३२ कि.मी.), 23 जून  सासवड मुक्काम, 24 जून  सासवड ते जेजुरी (१६ कि.मी.), 25 जून  जेजुरी ते वाल्हे (१२ कि.मी.), 26 जून वाल्हे ते लोणंद (२० कि.मी.) , 27 जूनला तरडगाव, 28 जूनला फलटण, 29 जूनला बरड, 30 जूनला नातेपुते, 1 जुलैला माळशिरस, 2 जुलैला वेळापूर, 3 जुलैला भंडीशेगाव आणि 4 जुलै रोजी वाखरी येथे मुक्काम असेल.

संत तुकाराम महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025

18 जून, बुधवार देहू पालखी प्रस्थान समारंभ, 19 जून, गुरुवार आकुर्डी पिंपरी-चिंचवड परिसरातून मिरवणूक निघेल, 20 जून, शुक्रवार पुणे (नानापेठ) पुण्यात सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांसह भव्य स्वागत समारंभ, 21 जून, शनिवार हडपसर , 22 जून, रविवार लोणी काळभोर, 23 जून, सोमवार यवत,  24 जून, मंगळवार वरवंड,  25 जून, बुधवार बारामती,  26 जून, गुरुवार इंदापूर, 27 जून, ,शुक्रवा अकलूज घोड्यांच्या परेड आणि धार्मिक विधींसह प्रसिद्ध रिंगण कार्यक्रम, 28 जून, शनिवार माळशिरस, 29 जून, रविवार नाटेपुते, 30 जून, सोमवार वेळापूर 1 जुलै, मंगळवार पंढरपूर रोड स्ट्रेच: प्रवासाचा शेवटचा टप्पा सुरू, 2 जुलै, बुधवार भंडीशेगाव, 3 जुलै, गुरुवार वाखरी: पंढरपूरला पोहोचण्यापूर्वी शेवटचा मोठा मुक्काम, 4 जुलै, शुक्रवार विश्रांती आणि तयारीचा दिवस, भाविक प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याची तयारी करतात, 5 जुलै, शनिवार पंढरपूरमध्ये आगमन: पवित्र शहरात भव्य स्वागत  6 जुलै, रविवार आषाढी एकादशी: विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्य उत्सव आणि दर्शन.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News