एका अभिनेत्रीच्या निधनाची धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘कांटा लगा गर्ल’ आणि ‘बिग बॉस 13’ मधील स्पर्धक शेफाली जरीवाला हिचं हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं आहे. शेफालीची प्रकृती खालावल्यानंतर तिचे पती पराग त्यांनी यांनी तिला कूपर रुग्णालयात नेले. परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या मृत्यू संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. वयाच्या 42 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला.
कांटा लगा’मुळे शेफाली चर्चेत
‘कांटा लगा’ या अल्बममधील गाणे रिलीज झाले आणि ते रिलीज होताच सर्वांच्या पसंतीस उतरले. या गाण्यात शेफाली जरीवालाचा बोल्ड लूक पाहायला मिळाला होता. या गाण्यामुळे शेफाली जरीवालाला चांगली प्रसिद्धी देखील मिळाली होती. 1964 सालच्या समझौता या सिनेमातील प्रसिद्ध गाणे कांटा लगाचे हे रीक्रएटेड व्हर्जन होते. हे गाणे प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी गायले होते. तर कल्याणजी-आनंदजी यांनी संगितबद्ध केले होते.

शेफाली जरीवाला हिचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी गुजरातमधील अहमदाबादमध्ये झाला होता. शेफाली जरीवाला अनेक रिअॅलिटी शोज, चित्रपट, गाण्यांचे अल्बममध्ये दिसून आली होती. नच बलिए 5 आणि नच बलिए 7 मध्येही शेफाली जरीवालाने सहभाग घेतला होता. 2019 मध्ये बिग बॉस 13 मध्येही स्पर्धेक म्हणून शेफाली दिसली होती.
2015मध्ये परागशी शेफालीचे लग्न
शेफाली जरीवालाचे दोन लग्न झाले होते. तिचे पहिले लग्न 2004 मध्ये मीत ब्रदर्सचे संगीतकार हरमीत सिंग यांच्याशी झाले होते, परंतु 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2015 मध्ये शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले. शेफाली जरीवालाने संगणक अनुप्रयोगात पदवी प्राप्त केली होती. मात्र अशा प्रतिभावान अभिनेत्रीच्या जाण्याने आता हळहळ व्यक्त केली जात आहे.