कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्व

अक्षय्य तृतीयेचे महत्व काय? जाणून घ्या तारीख, वेळ आणि पूजाविधी

अक्षय्य तृतीया हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचे सणांपैकी एक आहे. दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. हिंदू धर्मात, हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी सर्वोत्तम तिथी मानला जातो. अक्षय्य तृतीयेला कोणतेही शुभ कार्य सुरू केल्यानेही शुभ फळे मिळतात. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी शुभ कामाची सुरुवात, पूजा-आराधना, जप-तप, दान केल्याने अक्षय्य पुण्याची प्राप्ती होते, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी सोने-चांदी, वाहन, प्रॉपर्टी खरेदी करणेदेखील शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांची पूजा विशेषतः फलदायी मानली जाते. तर मग जाणून घेऊया की हा दिवस इतका खास का मानला जातो.

शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, या वर्षी वैशाख शुक्ल तृतीया तिथी २९ एप्रिल रोजी संध्याकाळी ५:२९ वाजता सुरू होईल आणि ३० एप्रिल रोजी दुपारी २:१२ वाजेपर्यंत राहील. उदय तिथीला हा उत्सव साजरा करण्याची परंपरा असल्याने, अक्षय्य तृतीया ३० एप्रिल २०२५, बुधवार रोजी साजरी केली जाईल. पूजेसाठी शुभ वेळ सकाळी ५:४१ ते दुपारी १२:१८ पर्यंत असेल.

अक्षय्य तृतीयेच्या पूजेची पद्धत

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. असे म्हणतात. या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती, समृद्धी येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. त्यानंतर घर स्वच्छ करून श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. श्री विष्णूला चंदन, पिवळे फूल आणि देवी लक्ष्मीला कुंकू, गुलाब, कमळ अर्पण करावे, दिवाबत्ती, धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी. विष्णू सहस्रनामाचे पठण करा. काहीजण कलश मांडून देखील पूजा करतात. तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करावा. गरजूंना अन्न, कपडे, पाणी आणि सोने दान करा.

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News