श्रावण महिना हा भगवान शिवाची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो. या महिन्यात शिवभक्त उपवास, रुद्राभिषेक आणि शिव मंत्रांद्वारे स्वतःमधील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात. श्रावण महिन्यात, विशेषतः सोमवारचे व्रत, जल अभिषेक आणि ओम नमः शिवाय सारख्या मंत्रांचा जप केल्याने मनाची शुद्धी आणि देवाचे आशीर्वाद मिळतात.
ओम नमः शिवाय

महामृत्युंजय मंत्र
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
- सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
- पूजा स्थळ स्वच्छ करून घ्या.
- हातात पाणी घेऊन मंत्र जपण्याचा संकल्प करा.
- 108 वेळा ओं नमः शिवाय आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
- जप करताना मनात भगवान शंकराचे ध्यान करा.
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात् ॥
दररोज सकाळी शिव गायत्री मंत्राचा जप करणे खूप शुभ मानले जाते. या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते, भीती आणि नकारात्मकता दूर होते, तसेच भगवान शंकराची कृपा प्राप्त होते. या मंत्राचा जप केल्याने मन शांत आणि स्थिर होते, ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि कामांमध्ये लक्ष केंद्रित करणे सोपे होते. या मंत्राचा नियमित जप केल्याने भगवान शंकराची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात. शिव गायत्री मंत्राचा जप केल्याने मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतात.
- सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावी.
- पूजेसाठी योग्य आसन घेऊन त्यावर बसावे.
- हातामध्ये पाणी घेऊन, ‘मी या मंत्राचा जप करत आहे’ असा संकल्प करावा.
- शक्य असल्यास, शिव-पार्वती आणि नंदीसमोर दिवा लावावा.
- मंत्राचा जप 108 वेळा किंवा आपल्याला शक्य असेल तितक्या वेळा करावा.
शिवमंत्रांचा जप करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
- पहाटे किंवा संध्याकाळी, म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.
- मंत्राचा जप करताना आपले लक्ष पूर्णपणे मंत्रावर केंद्रित करणे आवश्यक आहे.
- जप करताना तुमचे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असणे आवश्यक आहे.
- मंत्राचा उच्चार योग्य आणि स्पष्ट हवा
- मंत्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून जप करावा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)