कावळा देतो शुभ अशुभ घटनांचे संकेत, जाणून घ्या

शकुन शास्त्रामध्ये कावळ्याबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पौराणिक ग्रंथांमध्ये कावळा हा मृत्यूची देवता यमराजाचा दूत मानला जातो.

शकुन शास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात शुभ आणि अशुभ योग कशामुळे येऊ शकतात याची माहिती शास्त्रात दिली आहे. आपण काय करतोय, बाहेर जाताना काय पाहतोय किंवा आपल्या आजूबाजूला जे काही घडत आहे ते त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत आहे? याबद्दल शास्त्रात माहिती दिली आहे.  शकुन शास्त्रामध्ये कावळ्याबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊया….

घराजवळ कावळा दिसणे

घराजवळ कावळा दिसणे हे एक शुभ मानले जाते. सकाळच्या वेळी घराजवळ कावळा काव काव करत असेल, तर पाहुण्यांच्या आगमनाचे संकेत असू शकते. घरात पाहुणे येणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी येते. 

कावळा पाणी पिताना दिसणे

कावळा पाणी पिताना दिसला, तर ते शुभ मानले जाते. जर तुम्हाला कावळा पाणी पिताना दिसला तर, ते खूप शुभ मानले जाते. याचा अर्थ येत्या काळात तुम्हाला पैसा मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या कामात मोठे यश मिळणार आहे. हे शुभ लक्षण मानले जाते आणि लवकरच धनप्राप्ती किंवा यश मिळण्याची शक्यता असते. 

कावळा भाकरी किंवा अन्नाचा तुकडा घेऊन घरात येणे

कावळा घरात भाकरी किंवा पेंढा घेऊन आला तर हे शुभ लक्षण आहे, याचा अर्थ तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. हे शुभ लक्षण मानले जाते. 

कावळा मंदिरात दिसणे

जर कावळा मंदिरात दिसला तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल.

कावळ्याला खायला देणे

कावळ्याला सकाळी खायला देणे धार्मिक दृष्ट्या खूप महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की, यामुळे पुण्य मिळतं आणि घरात धन-धान्याची कमतरता नसते. घरासमोर किंवा जवळ कावळा दिसल्यास, त्याला अन्न देणे शुभ मानले जाते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News