आंघोळीनंतर कधीही करु नका ‘ही’ चूक, जाणून घ्या वास्तू नियम

वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये काही वस्तू ठेवणे चूकीचे आहे. वास्तूनुसार या गोष्टी बाथरूममध्ये ठेवल्याने गरिबी येते. या वास्तु टिप्सबद्दल जाणून घेऊया.

आंघोळीनंतर बाथरूममध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घेणे, वास्तुशास्त्रानुसार खूप आवश्यक आहे. आंघोळीनंतर काही चुका केल्यास तुम्ही कंगाल होऊ शकता. आंघोळीनंतर अनेक गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. वास्तूशास्त्रानुसार, या चुका घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढवतात. तसंच आर्थिक नुकसान होतं. यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नये. बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या

ओले कपडे ठेवू नका

आंघोळीनंतर ओले आणि अस्वच्छ कपडे बाथरूमध्येच सोडून येण्याची सवय अनेकांना असते. या सवयीमुळे तुमच्या कुडंलीतील सूर्य नाराज होऊ शकतो. जेव्हा आपण बाथरूममध्ये ओले किंवा घाणेरडे कपडे सोडतो तेव्हा सूर्यप्रकाशाची प्रभावीता कमी होऊ शकते. यामुळे तुमच्या घराच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते. बाथरूममध्ये कधीही ओले कपडे ठेवू नयेत. वास्तूनुसार, ओले कपडे असल्यास ते धुवा आणि लगेच घराबाहेर सुकविण्यासाठी ठेवा. बाथरूममध्ये ओले कपडे सोडल्याने सूर्यदोष होतो.

बाथरूम उघडे ठेवू नका
वास्तुशास्त्रानुसार, बाथरूम उघडे ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि सकारात्मक ऊर्जा बाहेर जाते, ज्यामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवणे चांगले असते, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा आत येऊ शकत नाही, असे मानले जाते. उघड्या बाथरूममुळे संसर्गजन्य जंतू घरात प्रवेश करू शकतात आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.

बाथरूम स्वच्छ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, आंघोळ केल्यानंतर बाथरूम स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असे मानले जाते. बाथरूम स्वच्छ ठेवल्यास घर आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जा आणि आरोग्य टिकून राहते.

बाथरूममध्ये गळलेले केस टाकू नका

आंघोळीनंतर तुम्ही जर बाथरूमध्ये गळलेले केस तसेच टाकून येत असाल, तर ही सवय तुम्हाला बंद केली पाहिजे. असे केल्याने शनी आणि मंगळ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात. या दोन्ही ग्रहांचा कोप तुमच्यावर होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार, तुटलेले केस नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि आर्थिक संकट किंवा नकारात्मक परिणाम निर्माण करतात.

बादली रिकामी सोडू नका

वास्तुशास्त्रानुसार, आंघोळ केल्यानंतर बादलीत अस्वच्छ पाणी ठेवणे योग्य नाही. याऐवजी बादली उलटी करून ठेवावी. तसेच, बाथरूममध्ये घाणेरडे पाणी सोडल्यास ते आर्थिक नुकसान आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते, असे मानले जाते. अस्वच्छ पाणी ठेवल्यास ते राहू आणि केतूच्या वाईट प्रभावाला आकर्षित करू शकते. बाथरूममध्ये अस्वच्छ पाणी ठेवल्यास ते आर्थिक नुकसान आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकते. बाथरूम स्वच्छ ठेवणे आणि अस्वच्छ पाणी लगेच काढून टाकणे शुभ मानले जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News