कारमध्ये ‘या’ गोष्टी ठेवाच? काय सांगते वास्तुशास्त्र जाणून घ्या…

गाडीत शुभ वस्तू ठेवल्याने अपघाताची शक्यता कमी होते, असा एक सामान्य समज आहे. काही लोक गाडीत देवाचे फोटो, किंवा शुभ वस्तू ठेवतात, जेणेकरून त्यांना प्रवासात चांगले अनुभव मिळतील आणि अपघात टाळता येतील.

गाडी चालवताना सतर्क राहणे खूप महत्वाचे आहे. निष्काळजीपणा हे अपघाताचे मुख्य कारण असू शकते. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिले असेल की लोक त्यांच्या गाडीत विविध प्रकारच्या वस्तू ठेवतात जेणेकरून सर्व प्रकारचा त्रास त्यांच्यापासून दूर राहतो. वास्तुशास्त्रानुसार गाडीत गणपती, कासव, किंवा देवाचे चित्र ठेवल्याने प्रवासात सुरक्षा आणि सकारात्मकता टिकून राहते. वास्तुशास्त्रात अनेक नियम सांगितले गेले आहे. कोणती दिशा कोणत्या तत्त्वाशी निगडीत आहे इथपासून ते रोजच्या वापरातल्या गोष्टीबाबत सांगितलं आहे. काही गोष्टी सकारात्मक परिणाम करत असतात. असंच वास्तुशास्त्रात गाडीबाबतही सांगण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या वस्तू गाडीत सकारात्मक उर्जा निर्माण करतात.

गणपती

गणपतीची छोटी मूर्ती किंवा फोटो गाडीत ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि प्रवास सुरक्षित राहतो, असे मानले जाते.

काळा कासव

वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि सकारात्मक उर्जेला चालना देण्यासाठी याचा वापर केला जातो. कासव हे दीर्घायुष्याचं प्रतिक आहे. त्यामुळे वाहनचालक आणि कुटुंबाचं दीर्घायुष्यासाठी गाडीत कासव ठेवावा. गाडीत कासव ठेवल्यास प्रवासात सकारात्मकता आणि सुरक्षा टिकून राहते.

मीठ

गाडीत मीठ ठेवल्याने अनेक फायदे मिळतात.  मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करते,आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते. प्रवासाला आनंददायी करते, असे वास्तुशास्त्रानुसार मानले जाते. गाडीच्या सीटखाली वर्तमानपत्र पसरवून त्यात खडे मीठ बांधून ठेवा. असे मानले जाते की मीठ नकारात्मक ऊर्जा शोषण्याचे काम करते.

नैसर्गिक दगड

काही नैसर्गिक दगड, जसे की क्रिस्टल कारमध्ये ठेवल्यास ते प्रवासादरम्यान सकारात्मक ऊर्जा देतात आणि शांतता टिकवून ठेवतात. तुम्ही तुमच्या कारच्या डॅशबोर्डमध्ये काही नैसर्गिक दगड ठेवू शकता, हे देखील शुभ मानले जाते. वास्तविक, वास्तुशास्त्रानुसार, ते पृथ्वीच्या घटकाशी मजबूत संबंध निर्माण करतात. एखाद स्फटिक किंवा नैसर्गिक दगड कारमध्ये ठेवण्याच फायद्याच ठरत. यामुळे तुम्ही संकटापासून दूर राहता.

पाण्याची बाटली

कारमध्ये पाण्याची बाटली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, असे वास्तुनुसार सांगितले जाते. पाणी हे लोहाचे कारक असल्याने, ते राहूच्या अशुभ प्रभावाला कमी करते आणि अपघातांपासून संरक्षण करते.

चिनी नाणी

वास्तुशास्त्रात गाडीत चिनी नाणी लटकवणे शुभ मानले जाते. चिनी नाणी तुमच्या कारचे डिझाइन, रंग, आतील भाग आणि आकार यांच्यात संतुलन राखते आणि नकारात्मकतेला दूर ठेवते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News