हिंदू धार्मिक ग्रंथ आणि पुराणांनुसार, देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सुख आणि संपत्ती मिळविण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. ज्यामध्ये शुक्रवारचे महत्त्व जास्त आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे जो व्यक्ती खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करतो. त्याच्यावर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद नेहमीच असतात. तर आज आपण अशाच काही उपायांबद्दल जाणून घेऊया…
लक्ष्मी सूक्ताचे पठण

नकारात्मकता दूर होते
शुक्रवारी मिठाच्या पाण्याने घर पुसल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. मीठ नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तीपासून संरक्षण करण्यासाठी वापरले जाते. नकारात्मक विचार कमी करा आणि सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केल्याने तुम्हाला चांगली ऊर्जा मिळू शकते.
पांढऱ्या वस्तू दान करा
शुक्रवारी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने किंवा लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक समस्या कमी होऊ शकतात. शुक्रवारी पांढरे कपडे, पांढरे फुलं, पांढरे मिठाई, दूध किंवा पांढऱ्या रंगाची इतर वस्तू गरीब लोकांना किंवा देवळात दान करा. देवी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला पांढरे फुलं, पांढर चंदन, पांढरी मिठाई आणि पांढरे वस्त्र अर्पण करा.
शुक्रवारी तिजोरीत कमळ ठेवणे
हिंदू धर्मात, कमळ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. कमळ हे धन, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. शुक्रवारी, विशेषत: लक्ष्मीची पूजा केल्यावर तिजोरीत कमळाचे फूल ठेवल्याने धन-संपत्ती वाढते, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, तिजोरीत कमळ ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि वातावरण शुद्ध होते. पूजा किंवा तिजोरीत ठेवण्यासाठी लाल किंवा गुलाबी रंगाचे कमळ अधिक शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)