Virat Kohli: ‘रन’मशिन कोहलीचा नवा विक्रम, सगळ्यांनाचं टाकलं मागे

विराट कोहलीने आता नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. सर्वात वेगाने 13 हजार टी ट्वेंटी धावा पूर्ण करणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

मुंबई: सोमवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरूद्ध मुंबई इंडियन्स या सामन्यात कोहलीने 67 धावा केल्या. यानिमित्ताने विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये 13000 धावा पूर्ण केल्या.असा विक्रम रचणारा कोहली पहिला भारतीय फळंदाज ठरला आहे. 36 वर्षीय कोहलीने त्याच्या खेळीदरम्यान 17 धावा केल्या तेव्हा हा टप्पा गाठला. 13000 टी-20 धावांचा टप्पा गाठणारा कोहली हा पहिला भारतीय आहे आणि हा टप्पा गाठणारा तो जगातील केवळ पाचवा फलंदाज आहे.

विक्रम करण्यासाठी कुणाला किती इनिंग्स?

ख्रिस गेल              381

विराट कोहली        386

अॅलेक्स हेल्स       474

शोएब मलिक        487

किरण पोलार्ड       594

सर्व स्तरांतून कौतूक

विराट कोहलीवर यानंतर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आणखी काही मोठे विक्रम

टी20 क्रिकेटमध्ये एकही चेंडू न टाकता विकेट घेण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2011 मध्ये इंग्लंडविरोधात विराट कोहली करिअरमधील पहिले षटक टाकण्यास आला. विराट कोहलीने टाकलेला चेंडू पंचांनी वाईड दिला. पण एमएस धोनीने त्या चेंडूवर केविन पीटरसनला स्टम्पिंग बाद केले.

विराट कोहलीने कसोटीत कर्णधार असताना सात द्विशतके ठोकली आहेत. असा करणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे. श्रीलंका 2, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात द्विशतक ठोकली आहेत.

सर्वात वेगवान 10 हजार धावांचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 205 डावात दहा हजार धावांचा पल्ला पर केला. विराट कोहलीने 10 वर्षांत 10 हजार धावांचा रेकॉर्ड तोडलाय.

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना 27 शतके ठोकली आहेत.

धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 5786 धावा केल्या आहेत. वनडेमधील त्याच्या एकूण धावांच्या 42.78 टक्के धावा पाठलाग करताना काढल्या आहेत.

कर्णधार असताना सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारा विराट कोहली पहिला भारतीय खेळाडू आहे. विराट कोहलीने भारताला 68 कसोटी सामन्यात 40 विजय मिळवून दिलाय. इतर देशात सात कसोटी जिंकणारा विराट एकमेव आशियाई कर्णधार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News