आज दिल्ली विरुद्ध राजस्थानमध्ये काँटे की टक्कर, कोण जिंकणार? सामन्याची वेळ काय?

दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने जिंकले आहेत.

मुंबई – आयपीएलचा २ व्या हंगाम आता रंगतदार स्थितीत पोहचा आहे. आज आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने या हंगामात आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, त्यापैकी २ सामने जिंकले आहेत. त्यामुळं राजस्थान रॉयल्सचा हा सामना जिंकण्याकडे कल असेल.

सामना किती वाजता?

दरम्यान, आयपीएलमध्ये आज दिल्ली कैपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना दिल्लीमधील स्व. अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) येथे खेळविला जाणार आहे. या मैदानावर आईपीएल 2025 मध्ये केवळ एक सामना खेळला गेला आहे. फलंदाजीसाठी पोषक या मैदानावरील खेळपट्टी असल्याचे बोलले जाते. फलंदाजांना चांगला स्कोर करण्यासाठी खेळपट्टी चांगली आहे. दरम्यान, आजचा सामना हा सांयकाळी साडे सात वाजता मँच सुरु होईल.

फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी…

दुसरीकडे याआधी दिल्लीमधील स्व. अरुण जेटली स्टेडियमवर जो सामना खेळविला गेला होता. यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियंसने 5 विकेट गमावत 205 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यामुळं या मैदानावरील खेळपट्टी फलंदानांसाठी पोषक आणि अनुकूल असल्याचे पिच क्युरोटर यांनी म्हटलं आहे.  त्यामुळं जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेईल. त्यामुळं आज घरच्या मैदानावर दिल्ली जिंकणार की, राजस्थान रॉयल्स बाजी मारणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


About Author

Astha Sutar

Other Latest News