संजू सॅमसन आता एका नवीन लीगमध्ये नवीन सुरुवात करण्यास सज्ज आहे. केरळ क्रिकेट लीग (KCL) च्या लिलावात त्याचे नाव पहिल्यांदाच समाविष्ट केले जाईल आणि ५ जुलै रोजी तो कोणत्या फ्रँचायझीसाठी खेळताना दिसेल हे ठरेल.
उजव्या हाताच्या या स्टार फलंदाजाने पहिल्यांदाच केसीएल लिलावासाठी आपले नाव पाठवले आहे. केसीएलसाठी खेळाडूंचा लिलाव ५ जुलै रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे आणि संजू या लिलावात सर्वात मोठा खेळाडू आहे.

संजू केसीएलचा ब्रँड अॅम्बेसेडर
२०२४ मध्ये झालेल्या केसीएलच्या पहिल्या हंगामात, संजू सॅमसन आंतरराष्ट्रीय सामन्यांमुळे खेळू शकला नाही. त्याला या लीगचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडण्यात आले होते, परंतु यावेळी परिस्थिती बदलली आहे. यावेळी संजू स्वतः लिलाव पूलमध्ये आहे आणि संघांच्या शीर्षस्थानी आहे.
केसीएलचा दुसरा हंगाम २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान खेळला जाईल. या काळात भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० मालिका होण्याची शक्यता आहे. जी १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, जर संजूला टीम इंडियाकडून संधी मिळाली नाही, तर तो केसीएलच्या प्लेऑफपर्यंत पूर्णपणे उपलब्ध असेल.
टीम इंडियामध्ये परतण्याची तयारी
संजू सॅमसन सध्या टीम इंडियाच्या टी-२० संघाबाहेर आहे. यावर्षी इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत त्याला संधी मिळाली होती, परंतु तो संघात आपले स्थान निश्चित करू शकला नाही. यावेळी केसीएलसारख्या देशांतर्गत व्यासपीठावर चमकदार कामगिरी करून संजू निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकतो.
केसीएलमध्ये कोणते संघ सहभागी होतील
केरळ क्रिकेट असोसिएशनच्या या टी-२० लीगच्या दुसऱ्या सीझनमध्एये कूण ६ संघ सहभागी होणार आहेत.
कोल्लम सेलर्स
कालिकत ग्लोबस्टार्स
अॅलेप्पी रिपल्स,
कोची ब्लू टायगर्स
थ्रिसूर टायटन्स
त्रिवेंद्रम रॉयल्स
२०२४ मध्ये झालेल्या केसीएलच्या पहिल्या हंगामात एकूण १६८ खेळाडूंनी आपली नावे नोंदवली होती, त्यापैकी ११४ खेळाडू संघांनी खरेदी केले होते. लिलावात फ्रँचायझींनी सुमारे ५० लाख रुपये खर्च केले. अंतिम सामन्यात, सचिन बेबीच्या नेतृत्वाखाली कोल्लम सेलर्सने कालिकत ग्लोबस्टार्सचा पराभव केला आणि केसीएलचे विजेतेपद जिंकले होते.