अभिषेक पोरेलने डाव सावरला
दरम्यान, प्रथम बॅटींग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने 188 धावा केल्या. चांगली सुरुवातीची अपेक्षा असताना दिल्लीचा ओपनर मॅक्गर्ग अवघ्या 9 धावांवर आऊट झाला. त्यानंतर करुण नायर रन आऊट झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. 34 वर दोन विकेट गेल्यानंतर अभिषेक पोरेल आणि केएल राहुल या दोघांनी दोन विकेट गेल्यानंतर दिल्लीचा डाव सावरला. अभिषेक पोरेलनं 49 तर केएल राहुल यानं 38 धावा केल्या.
शेवटच्या पाच ओव्हरमध्ये धुलाई
राहुल आणि पोरेलने डाव सावरल्यानंतर कर्णधार अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी 34 धावा केल्या. राजस्थानच्या बाॅलरच्या शेवटच्या पाच षटकात 76 धावा केल्या. दिल्लीने पाच फलंदाजांना गमवत 188 धावा केल्या.

राजस्थाने सामान बरोबरीवर थांबवला
188 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात चांगली यशस्वी जयस्वाल याने 51 तर संजू सॅमसंग 31 धावांवर बाद झाले. नितीश राणा याने 50 धावा करत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. मात्र, शेवटची ओव्हर मिचेल स्टार्क याने टाकताना ध्रुव जुरेल याला 188 रन्सचे टार्गेट पूर्ण करता आले नाही.