निकोलस पूरन न्यूयॉर्कमधील लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा कॅप्टन; टीम मॅनेजमेंटचा निर्णय

MLC लीगमध्ये पूरन मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन म्हणून जबाबदारी पाहणार आहे.

पूरनच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांनी या खेळाडूला मोठी लॉटरी लागली आहे. पूरनला मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने मोठी जबाबदारी दिली आहे. मुंबई इंडियन्स 18 व्या मोसमात सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरली. मुंबईला क्वालिफायर 2 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यानंतर आता फ्रँचायजीने दुसऱ्या लीग स्पर्धेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. निकोलस पूरन याची न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पूरनसाठी मोठी संधी

मेजर लीग क्रिकेट स्पर्धेतील गेल्या हंगामात किरॉन पोलार्ड याच्याकडे मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क संघाचं नेतृत्व होतं. पोलार्डच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क टीमने ट्रॉफी जिंकली होती. तर यंदा आगामी हंगामासाठी पोलार्डच्या जागी निकोलस पूरन याची नियुक्ती करण्यात आली आहे.

निकोलसची अलीकडेच निवृत्ती

लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन याने मोठा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. पूरनने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. पूरनच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांनी या खेळाडूला मोठी लॉटरी लागली आहे. पूरनला मुंबई इंडियन्स फ्रँचायजीने मोठी जबाबदारी दिली

 

 


About Author

Rohit Shinde

Other Latest News