IPL 2025 : सध्या आयपीएलचे सामने सुरू असून चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जला 18 व्या सीजनदरम्यान एक मोठा धक्का बसला आहे. टीमचे कर्णधार ऋतूराज गायकवाड याला दुखापत झाल्यामुळे तो संपूर्ण सीजनसाठी आयपीएलमधून बाहेर गेला आहे. अशात दिग्गज महेंद्र सिंह धोनीवर टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गायकवाडला आधीच होता संशय…
गायकवाडला पंजाब किंग्ज विरोधात खेळताना आपण पुढील सीजनमध्ये खेळू शकणार नसल्याचा संशय होता. मात्र शेवटच्या क्षणी त्याला फिट घोषित करण्यात आलं होतं आणि तो टॉससाठी मैदानातही उतरला होता. मात्र सामन्यादरम्यान त्याची दुखापत अधिक वाढली. त्यामुळे गायकवाड आता सीएसकेसाठी या सीजनमध्ये खेळू शकणार नाही, असं दिसतंय.

असं दुसऱ्यांदा घडलं…
महेंद्र सिंह धोनीच्या कर्णधारपदी सीएसकेच्या टीमने पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. असं दुसऱ्यांदा झालं जिथं कर्णधारपद सोडल्यानंतर धोनीला सीजनच्या मधोमध टीमची जबाबदारी करावी लागत आहे. यापूर्वी आयपीएल 2022 मध्येही असंच काहीसं झालं होतं. धोनीने आयपीएल 2021 नंतर सीएसकेचं कर्णधारपद सोडलं होतं. यानंतर रविंद्र जडेजाकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वात टीमने निराशाजनक कारगिरी केली होती. ज्यामुळे त्यांना कर्णदारपदावरुन पायउतार व्हावं लागलं. अशात गायकवाडनंतर आता एमएस धोनीवर टीमची जबाबदारी आली आहे.
30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळत असताना ऋतुराज गायकवाडच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला जोरात चेंडू लागला होता. त्यानंतर वेदनेने कळवळत गायकवाड थेट खालीच बसला होता. त्यावेळी पेन रिलीफ स्प्रे मारून तो पुढचा सामना खेळला. या सामन्यात त्याने अर्धशतक केलं होतं. मात्र ही जखम पुढच्या सामन्यादरम्यान अधिक वाढल्याने तो पुढील सीजन खेळू शकणार नसल्याचं समोर आलं आहे.