थरारा! 112 चे टार्गेटसमोर कोलकता 95 रन्सवर ऑल आऊट, पंजाबच ‘किंग्स’

मोहाली : आयपीएलच्या पंजाब किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सामान्यात हर्षत राणा आणि वरुण चक्रवती यांच्या भेदक गोलंदाजीमुळे 15.3 ओव्हरमध्ये पंजाबचा संघ 111 रन्सचे टार्गेट देऊ शकला. मात्र, हे किरकोळ वाटणारे टार्गेट देखील कोलकत्ता गाठू शकली नाही. 16 रन्सने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यजुर्वेंद्र चहल याच्या बाॅलिंगपुढे कोलकताच्या बॅटरने नांगी टाकली

प्रथम बॅटींग करणाऱ्या पंजाबची सुरुवात आश्वासक झाली होती. मात्र, 39 रन्सवर प्रियांश आर्य याला हर्षत राणा याने आऊट केले आणि तेथून पंजाबचा संघाचा डाव गडगडला तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार श्रेयश अय्यरला आपले खाते देखील उघडता आले नाही. राणानेच त्याला रमणदीप सिंगकडे कॅच आऊट केले.

धोकादायक मॅक्सेवल देखील काही कमाल करू शकला नाही. वरुण चक्रवतीने त्याला अवघ्या सात रन्सवर बाॅल्ज केले. त्यानंतर शशांक सिंग आणि झेवियर बार्टलेट यांनी संघर्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फार यश आले नाही. शशांक सिंग 18 तर झेवियर बार्टलेट 11 रन्सवर आऊट झाले.

राणा-चक्रवतीने पंजाबची कमरडे मोडले

हर्षत राणा याने अवघ्या तीन ओव्हरमध्ये 25 रन्स देत पंजाबचे आघाडीच्या तीन बॅटरला आऊट केले. त्यामध्ये प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, श्रेयश अय्यर यांचा समावेश होता. तर, वरुण चक्रवतीने अवघ्या 5.20 च्या इकोनाॅमीने 21 रन्स देत दोन विकेट घेतल्या. तर, सुनील नारायण याने देखील अवघ्या 14 धावात देत दोघांना आऊट केले.

कोलकत्त्याची अडखळत सुरुवात

अवघ्या 112 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकत्ता संघाची सुरुवात देखील अडखळत झाली. ओपनर सुनील नारायण हा पाच रन्सवर अससाना मार्को जॅनसेन याच्या बाॅलिंगवर आऊट झाला. त्यानंतर डिकाॅक देखील अवघ्या दोन धावांवर आऊट झाला. त्यामुळे अवघ्या दोन ओव्हरमध्ये कोलकत्ताची अवस्था दोन बाद सात अशी झाली होती.

रघुवंशी-रहाणेने डाव सावरला

सात बाद 2 अशी अवस्था असताना मैदानात अंगक्रिश रघुवंशी आणि अजिंक्य राहणे होते. त्या दोघांनी कोलकत्ताचा डाव सावरला. अंगक्रिश याने फटकेबाजी सुरू केली. तर राहणे संयमी फटके खेळत होता. दोघांनी 50 रन्सची पार्टनरशिप करत डाव सावरला. मात्र यजुवेंद्र चहल याच्या बाॅलिंगवर राहाणे 17 रन्सवर एलबीडब्लू झाले.

चहलचे तुफान

अवघ्या 112 धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या चहलने आपल्या बाॅलिंगने कोलकत्त्याच्या बॅटरला चकीत केले. युजर्वेंद्र चहल याने अवघ्या 24 रन्स देत चार बॅटरला आऊट केले.

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News