John Cena Retirement : जॉन सीना हा WWE च्या सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक आहे. त्याला ‘द सेनेशन लीडर’ म्हणूनही ओळखले जाते. जॉन सीना हा WWE ने निर्माण केलेल्या सर्वात प्रसिद्ध स्टारपैकी एक मानला जातो. त्याने त्याच्या खेळाद्वारे व्यावसायिक कुस्तीच्या जगात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. यामुळे त्याला हॉलिवूडमध्येही ओळख मिळाली. WWE मधील २५ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर, जॉन सीना २०२५ मध्ये त्याची रिटायरमेंट टूर सुरू करेल.
WWE नुसार, सीना २०२५ च्या अखरेपर्यंत त्याच्या रिटायरमेंट टूरसाठी उपलब्ध असेल. तो अनेक परदेश दौऱ्यांचा आणि प्रमुख PLE चा भाग असेल. तर रेसलमेनिया ४१ हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक होता.

२५ वर्षांच्या कारकिर्दीत, २००० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते आजपर्यंत, सीना WWE मधील सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक आहे. विषेष म्हणजे जॉन सीना नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे आणि WWE इतिहासातील सर्वात खास व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. WWE मध्ये असताना, तो हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या कुस्तीपटूंपैकी एक होता. तो कंपनीच्या टॉप मर्चेंडाईज मूव्हर्सपैकी एक होता.
जॉन सीनाची एकूण संपत्ती
सेलिब्रिटी नेट वर्थनुसार, २०२५ मध्ये जॉन सीनाची एकूण संपत्ती अंदाजे ८० मिलियन डॉलर्स आहे. हे त्याच्या WWE सोबतच्या करारातून मिळालेली कमाई, त्याच्या चित्रपट कारकिर्दीतून आणि जाहिरातींमधून मिळालेल्या कमाईवर आधारित आहे. नेट वर्थच्या बाबतीत सध्याच्या आणि माजी WWE स्टार्समध्ये सीना द रॉकच्या मागे आहे. कुस्ती आणि अभिनयाव्यतिरिक्त, जॉन सीना कॅप्री सन, जिलेट, हेफ्टी आणि होंडा सारख्या अनेक ब्रँडचा ब्रँड अॅम्बेसेडर देखील आहे.
जॉन सीना दरवर्षी किती कमावतो?
स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडच्या मते, मार्च २०२५ पर्यंत जॉन सीना दरवर्षी १२ दशलक्ष डॉलर्स कमावतो. यापूर्वी, जॉन सीनाला WWE २०१८ स्पर्धेतून १० दशलक्ष डॉलर्सची रक्कम मिळाली होती. ज्यामुळे तो आतापर्यंतचा सर्वाधिक मानधन घेणारा कुस्तीगीर बनला. सीनाच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर, त्याने शायद शरियातझादेह हिच्याशी लग्न केले आहे. दोघांनी २०१९ मध्ये डेटिंग सुरू केली आणि ऑक्टोबर २०२० मध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले.