वर्षातील पहिली सोमवती अमावस्या कधी? जाणून घ्या महत्व आणि शुभ मुहूर्त…

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीबरोबरच अमावस्या तिथीलाही विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान केल्याने व्यक्तीला पुण्यफळ मिळते. चला जाणून घेऊया 2025 मधील पहिली सोमवती अमावस्या कधी आहे.

आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा व अमावस्या तिथीला खूप महत्वाचे मानले जाते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याला येणारी पौर्णिमा आणि अमावस्या महत्वाची असते. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने शुभ फळे मिळतात असे मानले जाते. हिंदू धर्मात या दिवशी पूर्वजांची पूजा, पितरांचे स्मरण आणि दान करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. हिंदू धर्मातील सर्व अमावस्या तिथीमध्ये मौनी आणि सोमवती अमावस्या सर्वात महत्वाची मानली जाते. या दिवशी देवाची उपासना करणे अत्यंत फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊयात या अमावास्येची तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व.

सोमवती अमावस्या तारीख

2025 मध्ये, वर्षातील पहिली सोमवती अमावस्या 26 मे रोजी असेल. या दिवशी, अमावस्या सोमवारच्या दिवशी येत असल्याने, तिचे विशेष महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील सोमवती अमावस्या 26 मे रोजी दुपारी 12 वाजून11 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 27 मे रोजी पहाटे 08 वाजून 31 मिनिटांनी संपन्न होते. सोमवती अमावस्या २६ मे रोजी साजरी केली जाईल कारण हा दिवस सोमवार आहे.

स्नान व दान शुभ मुहूर्त

ज्येष्ठ महिन्यातील सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नानाचा ब्रह्म मुहूर्त सकाळी 4:03 ते 4:44 आणि 4:24 ते 5:25 दरम्यान आहेत. या शुभ मुहूर्तावर तुम्ही स्नान आणि दान करू शकता. या दिवशी गंगेत स्नान केल्याने त्याचबरोबर दान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतो आणि व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळते.

सोमवती अमावस्यचे महत्व

सोमवती अमावस्या ही हिंदू धर्मात विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण या दिवशी सोमवार आणि अमावस्या यांचा योग असतो. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती देवीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण हा दिवस भगवान महादेवाला समर्पित आहे. असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते. याशिवाय सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याबरोबरच पितरांचे तर्पण व श्राद्ध देखील केले जाते. अशाने व्यक्तीला पितरांचा आशीर्वाद मिळतो. सोमवती अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि अन्य उपाय केले जातात, ज्यामुळे त्यांना शांती मिळते आणि कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद राहतात. विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News