IPL Orange And Purple Cap Leaderboard 2025 : आयपीएल २०२५ चा ६९ वा सामना आज (२५ मे) पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. सध्या जर आपण पर्पल कॅपबाबत बोलायचे झाले तर ती सीएसकेच्या नूर अहमद याच्याकडे आहे. पण आता सीएसकेचे सर्व सामने संपले आहेत. अशा स्थितीत लवकरच दुसरा गोलंदाज त्याला मागे टाकून ही कॅप हिसकावून घेईल.
१० संघांनी सुरू झालेल्या आयपीएल २०२५ मध्ये आता फक्त ४ संघ जेतेपदाच्या शर्यतीत उरले आहेत, जे प्लेऑफ सामने खेळतील तर इतर ६ संघांची स्वप्ने भंगली आहेत. त्या ६ संघांमधील अनेक खेळाडू ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी प्रबळ दावेदार होते पण आता ते या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

सध्या ऑरेंज कॅप कोणाकडे आहे?
सध्या ऑरेंज कॅप गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनकडे आहे, त्याने १४ सामन्यांमध्ये ६७९ धावा केल्या आहेत. मिचेल मार्श, यशस्वी जयस्वाल हे स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ५ खेळाडूंमध्ये आहेत. पण आता ते ऑरेंज कॅपपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
आयपीएल २०२५ ऑरेंज कॅप लीडरबोर्ड
साई सुदर्शन (GT) – ६७९ धावा
शुभमन गिल (GT) – ६४९ धावा
सूर्यकुमार यादव (MI) – ५८३ धावा
मिचेल मार्श (LSG) – ५६० धावा (संघ बाद)
यशस्वी जैस्वाल (RR) – ५५९ धावा (संघ बाद)
विराट कोहली (RCB) – ५४८ धावा
केएल राहुल (DC) – ५३९ धावा (संघ बाद)
जोस बटलर (GT) – ५३८ धावा (आता उपलब्ध नाही)
निकोलस पूरन (LSG) – ५११ धावा (संघ बाद)
श्रेयस अय्यर (PBKS) – ४८८ धावा
हेनरिक क्लासेन (SRH) – ४८७ धावा (संघ बाद)
प्रभसिमरन सिंग (PBKS) – ४८६ धावा
एडन मार्कराम (LSG) – ४४५ धावा (संघ बाद)
अभिषेक शर्मा (SRH) – ४३९ धावा (टीम आऊट)
रियान पराग (RR) – ३९३ धावा (संघ बाद)
सध्या पर्पल कॅप कोणाकडे आहे?
पर्पल कॅप त्या गोलंदाजाकडे असते, ज्याने स्पर्धेत सर्वाधिक बळी घेतलेले असतात. सध्या सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू म्हणजे नूर अहमद आहे, ज्याने १४ सामन्यांत २४ बळी टिपले आहेत. मात्र त्याचा संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडलेला असल्याने तो आता उर्वरित सामने खेळू शकणार नाही. प्रसिद्ध कृष्णा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने २३ बळी घेतले आहेत. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट १९ बळीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
पर्पल कॅप २०२५ लीडरबोर्ड
नूर अहमद (CSK) – २४ बळी (संघ बाहेर)
प्रसिद्ध कृष्णा (GT) – २३ बळी
ट्रेंट बोल्ट (MI) – १९ बळी
जोश हेजलवुड (RCB) – १८ बळी
वरुण चक्रवर्ती (KKR) – १७ बळी (संघ बाहेर)
साई किशोर (GT) – १७ बळी
वैभव अरोडा (KKR) – १७ बळी (संघ बाहेर)
जसप्रीत बुमराह (MI) – १६ बळी
अर्शदीप सिंग (PBKS) – १६ बळी
पॅट कमिन्स (SRH) – १६ बळी (संघ बाहेर)
हर्षल पटेल (SRH) – १६ बळी (संघ बाहेर)
कुलदीप यादव (DC) – १५ बळी (संघ बाहेर)
क्रुणाल पांड्या (RCB) – १५ बळी
मोहम्मद सिराज (GT) – १५ बळी
खलील अहमद (CSK) – १५ बळी (संघ बाहेर)
आयपीएल २०२५ मध्ये आजचा सामना
आज २६ मे रोजी आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना आहे. हा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाईल. जो संघ जिंकेल तो टॉप २ मध्ये आपले स्थान निश्चित करेल आणि क्वालिफायर १ मध्ये खेळेल तर दुसऱ्या संघाचे भवितव्य उद्याच्या सामन्यावर अवलंबून असेल.