धोनीच फटकेबाजीही चेन्नईला वाचवू शकली नाही! पराभवाचा चौकार, पंजाबच ‘किंग’

मागील काही सामान्यांमध्ये सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी येत होता. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील होत होती. मात्र, पंजाब विरुद्धच्या सामन्या तो पाचव्या क्रमांकवर फलंदाजीस आला.

पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचमध्ये पंजाबने एकर्फे वर्चस्व गाजवले. चेन्नईला चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. 12 चेंडूत 27 धावांची खेळी करूनही महेंद्रसिंग धोनी चेन्नईचा पराभव टाळू शकला नाही. या पराभवाने पाॅईंटटेबलमध्ये चेन्नई तळाला गेली आहे. 219 रन्सच्या टार्गेटपुढे चेन्नई 201 रन्स करू शकली. 18 रन्सने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबची अवस्था पाच बाद 85 झाली होती. मात्र, सलामवीर 24 वर्षीय प्रियांशने धुव्वाधार बॅटींग करत अवघ्या 39 चेंडूत शतक लगावले. प्रियांशची खेळी सात चौकार आणि 9 गगनचुंबी षटकारांनी सजली होती. पंजाबची आघाडीची फळी चाचपडत असताना प्रियांशने आपला धडका कायम ठेवला. एकामागून एक फलंदाज बाद होत असताना प्रियांशच्या आपली टोलेबाजी कायम ठेवली. पंजाबचा सलामीवीर मुकेश चौधरीला आपले खाते देखील उघडता आले नाही. तर कर्णधार श्रेय्यश अय्यर 9 धावांवर बाद झाला तर मार्कस स्टाॅयनिस आणि ग्लेन मेक्सवेल हे देखील अवघ्या चार धावा काढून बाद झाले.

आयपीएलमधील दुसरे शतक

हैद्राबादचा फलंदाज ईशान किशन याने आपीएलच्या यंदाच्या हंगामात पहिले शतक झळकवले होते. त्याच्यानंतर आज प्रियांशने आयपीएलमधील दुससे शतक चैन्नईच्या विरोधात केले. विशेष म्हणजे प्रियांशचे हे पहिलेच आयपीएल शतक आहे.

ऋतुराज गायकवाड अपयश

चेन्नईची सुरुवात आश्वासक झाली होती. 10 च्या सरासरीने रन्स होत असताना सातव्या ओव्हरमध्ये सलामीवीर रचिन रविंद्र हा 36 रन्सवर मॅक्सवेलच्या बाॅलिंगवर कॅच देत आऊट झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार ऋतुराज गायकवाडला अवघी एक रन्स करता आली. तो शशांक सिंगकडे कॅच देत बाद झाला. त्यामुळे चैन्नईची अवस्था दोन बाद 62 अशी झाली होती.

महेंद्र धोनी पाचव्या क्रमांकावर

मागील काही सामान्यांमध्ये सातव्या किंवा आठव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी येत होता. त्यामुळे त्याच्यावर टीका देखील होत होती. मात्र, पंजाब विरुद्धच्या सामन्या तो पाचव्या क्रमांकवर फलंदाजीस आला. दोन ओव्हरमध्ये 40 पेक्षा अधिक धावांची आवश्यकता असताना धोनीने फटकेबाजी केली. मात्र, शेवटच्या 20 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर तो कॅचआऊट झाला. त्यामुळे पंजाबचा डाव 201 धावांवर थांबला आणि पंजाबने 18 धावांनी विजय मिळवला.


About Author

Astha Sutar

Other Latest News