चेन्नई, मुंबईस, राजस्थासारख्या बलाढ्या संघांना पराभूत करून सलग चार विजय मिळवणाऱ्या गुजरात टायटन्सचा विजय रथ लखनौ सुपर जायंट्सने रोखला. गुजरातने पहिल्यांदा बॅटींग लखनौसमोर १८० धावांचे टार्गेट ठेवले होते. लखनौचा बॅटर निकोलस पूरन याने धडाकेबाज 61 धावा अन् एडेन मार्करमच्या 58 धावा याच्या सहा विकेट राखून लखनौने दणदणीत विजय मिळवला.
गुजरात संघाची सुरुवात आश्वासक झाली. सलग सहाव्या सामन्या ओपनर बॅटर साई सुदर्शन फिफ्टी केली. तर, कर्णधार शुभमन गिल याने 60 धावा फटकाल्या. 120 धावांवर गुजराती पहिली विकेट शुभमनच्या रुपाने पडली त्यानंतर अवघ्या दोन धावांची भर घालून साई सुदर्शन देखील रवी बिश्नोईच्या बाॅलिंगवर पूरनकडे कॅच आऊट झाला.

जोस बटल फेल
120 वर पहिली विकेट पडल्यानंतर सुस्थिती वाटणार गुजरातच्या संघाने 180 धावा केल्या. मधल्या फळतीली एकाही बॅटरला मोठी खेळी करता आली नाही. शाहरूख खान 22 तर, जोस बटलर 16 धावाकाढून बाद झाले.
लखनौचा आत्मविश्वास उंचावला
मागील काही सामन्यांमध्ये जय पराजयचा खेळ सुरू असलेल्या लखनौने संघाने सलग चार विजय मिळवणाऱ्या गुजरात पराभव केल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. मात्र, कर्णधर ऋषभ पंत याची बॅटींग लखनौसाठी डोकेदुखी ठरत आहे. ओपनर म्हणून मैदानात आलेल्या ऋषभला याही सामन्यात चमक दाखवता आली नाही. तो 21 धावा काढून बाद झाला.