हैद्राबाद : आयपीएलमध्ये सनराईज हैद्राबाद विरुद्ध पंजाबच्या मॅचचा धक्कादायक निकाल लागला आहे. पंजाबने प्रथम बॅटींग करताना तब्बल 245 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र, हैद्राबादचे ओपनर बॅटर अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेडच्या वादळापुढे पंजाबची धुळधाण उडाली.
अभिषेक शर्मा शतकी तडाखा देत 55 चेंडूत141 धावांची वादळी खेळी केली. या मध्ये त्यांनी तब्बल 10 षटकार आणि 14 फोर लगावले. हेडने देखील 37 चेंडूत 66 रन्स फटकावल्या. त्यात त्याने चार फोर तर तीन षटकार लगावले. यजुवेंद्र चहलच्या बाॅलिंगवर मॅक्सवेलकडे कॅच देत आऊट झाला. अभिषेकची वादळी खेळी अर्शदीप सिंगने थांबवली. मात्र, तोपर्यंत साामना पंजाबच्या हातातून गेला होता.

श्रेयशची आक्रमक खेळी
प्रथम बॅटींग करणाऱ्या पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयश अय्यर याने 36 बाॅलमध्ये 82 धावांची खेळी केली. त्यामध्ये त्याने सहा फोर तर सहा सिक्स लगावले. तर, प्रियांश आर्य याने देखील 13 बाॅलमध्ये 36 धावांची खेळी केली.
शमीला सलग चार सिक्स
पंजाबचा बॅटर मार्कस स्टॉइनिस याने 20 वी ओव्हर टाकणाऱ्या मोहम्मद शमीची धुलाई केली. त्याने सलग चार षटकार शमीला लगावले शमीच्या या एकाच ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा मार्कस याने वसूल केल्या.