श्री क्षेत्र भीमाशंकरांचा कायापलट होणार, विकास आराखड्यास 288.17 कोटींची शासनाची मान्यता

याठिकाणी हेलीपॅड सुविधा उपलब्ध करुन देण्याचेही नियोजन करावे. या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने उपलब्ध करुन द्यावीत. तसेच राजगुरुनगर-तळेघ- भीमाशंकर महामार्ग हा सुरळित वाहतूक व्यवस्थेसाठी उत्तम पर्याय आहे.

Shri Kshetra Bhimashankar : श्री क्षेत्र भीमाशंकरबाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे. श्री क्षेत्र भीमाशंकरांचा आता कायापलट होणार आहे. या क्षेत्राचा सुनियोजितपणे दर्जेदार विकास करा, आणि विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरु करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दरम्यान, श्री क्षेत्र भीमांशकर विकास आराखडा गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी सुविधांचे नियोजनासाठी 288.17 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.

गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था…

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे पर्यटक भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चोख सुरक्षा व्यवस्था ठेवावी, त्यासाठी अतिरिक्त पोलिस चौकी या परिसरात उभारावी. तसेच अखंडित वीज पुरवठा सुविधा उपलब्धतेच्या दृष्टीने वीज उपकेंद्र ही याठिकाणी द्यावे. कुंभमेळा सुरु होण्यापूर्वी श्री क्षेत्र भीमाशंकर येथील विकासाची कामे पूर्ण करावी, त्यादृष्टीने विकास आराखड्याच्या अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा, कालबद्ध कार्यक्रम ठरवून काम सुरू करण्यात यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले.

कुंभमेळ्या आधी सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात…

भीमाशंकर परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन येथे व्यापक प्रमाणात इको टुरिझम संकल्पना विकसित करण्यात यावी. श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या संख्यने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू मानून याठिकाणी विविध दर्जेदार सुविधा विकसित कराव्यात. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या वनराईचा उपयोग करुन वनभ्रमण पथ तयार करावे. त्याचसोबत पर्यटक,भाविकांसाठी रोप वे ची सुविधा विकसित करावी, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News