आता प्लेऑफचा थरारचा रंगणार, सामने कधी, किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

बेंगळुरूने लखनऊविरुद्ध २२८ धावांचे लक्ष्य ६ विकेट्स राखून पूर्ण केले आणि गुणतालिकेत अव्वल २ मध्ये आपले स्थान निश्चित केले. या विजयासह प्लेऑफचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

IPL 2025 Playoffs Schedule : आयपीएल २०२५ ची लीग स्टेज आता समाप्त झाली आहे. यंदाच्या आयपीएलमधील शेवटचा लीग सामना म्हणजे ७०वा सामना २७ मे रोजी लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने एलएसजीचा पराभव करून केवळ प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले.

या सामन्यात बेंगळुरूने लखनऊविरुद्ध २२८ धावांचे लक्ष्य ६ विकेट्स राखून पूर्ण केले आणि गुणतालिकेत अव्वल २ मध्ये आपले स्थान निश्चित केले. या विजयासह प्लेऑफचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.

प्लेऑफचे वेळेपत्रक 

आरसीबीच्या विजयानंतर, सर्व चारही स्थाने निश्चित झाली आहेत.

पंजाब किंग्ज – लीग टप्प्यात अव्वल स्थान

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – दुसरे स्थान

गुजरात टायटन्स – तिसरे स्थान

मुंबई इंडियन्स – चौथे स्थान

प्लेऑफ वेळापत्रक

क्वालिफायर-१

स्थळ – महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड

वेळ – २९ मे २०२५, संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून

संघ – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज

जो संघ हा सामना जिंकेल तो थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचेल.

एलिमिनेटर

स्थळ – महाराजा यादविंद्र सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, मुल्लानपूर, चंदीगड

वेळ – ३० मे २०२५, संध्याकाळी ७:३० वाजल्यापासून

संघ – गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

पराजित संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ क्वालिफायर-२ मध्ये खेळेल.

क्लालिफायर-२

स्थळ- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

वेळ- १ जून २०२५, संध्याकाळी ७:३० वाजता

संघ- क्वालिफायर-१ मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरचा विजेता संघ

अंतिम सामना

स्थळ- नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

वेळ- ३ जून २०२५, संध्याकाळी ७:३० वाजता

संघ- क्वालिफायर-१ आणि क्वालिफायर-२ मधील विजेता संघ

हे सामने कुठे पाहायचे

टीव्ही प्रसारण: सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील.

ऑनलाइन स्ट्रीमिंग: मोबाइल आणि ऑनलाइन प्रेक्षकांसाठी JioHotstar अॅपवर थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.

आरसीबी चाहते खूपच उत्सुक

यावेळी आरसीबी चाहते खूप उत्सुक आहेत, कारण संघाचा फॉर्म जबरदस्त आहे. त्याच वेळी, पंजाब किंग्ज प्रथमच क्वालिफायर-१ मध्ये खेळतील आणि अव्वल स्थानावर असतील. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सकडे अनुभव आहे आणि दोन्ही संघांनी अशा परिस्थितीत अनेक वेळा स्वतःला सिद्ध केले आहे. आता यावेळी आयपीएल २०२५ चे विजेतेपद कोण जिंकेल हे पाहणे रोमांचक असेल.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News