आज आरसीबी जिंकली तर मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढणार; आता असं आहे प्लेऑफचं संपूर्ण समीकरण

पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर पंजाब किंग्ज सध्या १९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि या दोन्ही संघांचे सर्व १४ सामने पूर्ण झाले आहेत.

IPL 2025 Playoff Schedule : आज IPL २०२५ मध्ये शेवटचा लीग सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात टक्कर होणार आहे. RCB आधीच प्लेऑफमध्ये पोहोचली आहे, तर लखनऊची टीम अंतिम फेरीच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडली आहे. हे निश्चित झाले आहे की पंजाब किंग्स पहिला क्वालिफायर सामना खेळणार आहे, तर मुंबई इंडियन्सला एलिमिनेटर सामन्याची आव्हानं पार करावी लागणार आहेत.

लीग टप्प्यातील शेवटचा सामना समोर आला असला तरी अद्याप प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक स्पष्ट झालेले नाही.

जर आपण पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर पंजाब किंग्ज सध्या १९ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गुजरात टायटन्स १८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे आणि या दोन्ही संघांचे सर्व १४ सामने पूर्ण झाले आहेत. मुंबई इंडियन्स १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि ते चौथ्या स्थानावर राहील. पण आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विजय अंतिम सामन्यातील सर्व समीकरणे बदलू शकतो.

गुजरात-मुंबईची अडचण वाढणार

टॉप-४ मध्ये RCB ही एकमेव टीम आहे, जिने अजून एक सामना खेळायचा आहे. जर आज बेंगळुरूने LSG वर मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर ती पॉइंट टेबलमध्ये टॉपवर पोहोचेल. अशा स्थितीत RCB आणि पंजाब किंग्स यांच्यात पहिला क्वालिफायर सामना होईल. जर हे घडलं, तर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्ससाठी परिस्थिती कठीण होऊ शकते.

मुंबई इंडियन्स एलिमिनेटर सामना खेळणार

RCB जर पहिल्या क्वालिफायरमध्ये पोहोचते, तर गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळला जाईल. अशा परिस्थितीत गुजरात-मुंबई यांपैकी एकच टीम पुढे जाऊ शकते. एलिमिनेटर जिंकणाऱ्या टीमला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी क्वालिफायर-१ मध्ये हरलेल्या टीमलाही पराभूत करावे लागेल. त्यामुळे गुजरात किंवा मुंबई यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी सलग दोन विजय आवश्यक असतील.

हे निश्चित आहे की मुंबई इंडियन्स एलिमिनेटर सामना खेळणार आहे, पण गुजरातची टीम आज RCB वर LSG चा विजय व्हावा अशी आशा करत असेल, जेणेकरून त्यांना क्वालिफायर १ मध्ये स्थान मिळू शकेल.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News