काल गुजरातने दिल्ली विरूद्ध विजय मिळविल्याने आयपीएलचं चित्र स्पष्ट झालं आहे. दरम्यान गुजरातच्या विजयामुळे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघही प्लेऑफमध्ये पोहचले. गुजरातचा हा नववा विजय ठरला. त्यामुळे गुजरात 18 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे. तर आरसीबी आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 17-17 गुण आहेत. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या आणि पंजाब किंग्स तिसऱ्या स्थानी आहे.
गुजरात,बंगळुरू आणि पंजाब प्ले ऑफ्समध्ये
गुजरातच्या विजयासह आरसीबी आणि पंजाब किंग्जनेही प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. आरसीबी संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यात 8 विजय आणि 17 गुणांसह हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. या संघाचा नेट रन रेट 0.482 आहे. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघाचा नेट रन रेट 0.389 असून त्यांचेही 17 गुण आहेत.

Time is running out! ⏳
3️⃣ spots taken. Just 1️⃣ left.
Which team will grab that last golden ticket? ✍ #TATAIPL pic.twitter.com/gaCjDRtPsQ
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
चौथ्या स्थानासाठी मोठी चुरस
आता आयपीएल प्ले ऑफ्ससाठी चौथ्या जागेवर कोणता संघ पात्र ठरणार, याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे. आता त्याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत 3 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. फक्त एकच स्थान शिल्लक आहे, ज्यासाठी मुंबई इंडियन्स (14 गुण), दिल्ली कॅपिटल्स (13 गुण) आणि लखनौ सुपर जायंट्स (10 गुण) शर्यतीत आहेत. या तिन्ही संघांपेक्षा मुंबईकडे जास्त गुण असल्याने त्यांना अधिक संधी आहे. हा संघ 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. या संघाचा नेट रन रेट 1.156 आहे. तरी देखील आगामी काळात होणाऱ्या सामन्यांचा निकाल नेमका काय येतो, कोणत्या संघांचा नेट रन रेट किती राहतो, यावर आयपीएलची गणिते अवलंबून असणार आहेत.