आयपीएलमध्ये आज बंगळुरू वि. लखनऊ सामना; बंगळुरू टॉप 2 मध्ये जाणार?

आयपीएलमध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जायंट्स असा सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत बंगळुरूचा संघ टॉप 2 मध्ये जातो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आयपीएल 2025 च्या हंगामातील एक महत्वाचा सामना आज खेळला जात आहे. हंगामातील हा 70 वा सामना रॉयल चॅलेंंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स या संघामध्ये आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. लखनऊच्या स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना अतिशय निर्णायक असणार आहे. लखनौ या सामन्यात विजय मिळवून आरसीबीचं गणित बिघडवू शकते.

आरसीबी टॉप 2 गाठणार?

लखनौ आणि आरसीबी या दोन्ही संघांचा हा 14 वा सामना असणार आहे. लखनौचं या हंगामातील आव्हान संपुष्ठात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफसाठी क्वालिफाय केलंय. मात्र आरसीबीसाठी हा सामना टॉप 2 च्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरसीबीचा हा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र लखनौ आरसीबीला पराभूत करत त्यांच्या गेम करु शकते. त्यामुळे हा सामना कोण जिंकतं? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबीची चमकदार कामगिरी

आरसीबीने या मोसमात 13 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर आरसीबाला 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात 17 पॉइंट्स आहेत. आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर लखनौने 13 पैकी 6 सामने जिंकलेत. तर लखनौचा 7 वेळा पराभव झालाय. लखनौ 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. आरसीबीला आजच्या सामन्यातील विजय अत्यंत महत्वाचा आहे.

प्लेयिंग इलेव्हन – आरसीबी

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, टीम डेव्हिड, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्नील सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग, जोश हेझलवूड, नुवान तुषारा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.

प्लेयिंग इलेव्हन – लखनौ

मिचेल मार्श, आर्यन जुयाल, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), आयुष बडोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, आकाश दीप, आवेश खान, विल्यम ओरुर्क, आकाश महाराज सिंग, रवी बिश्नोई, मणिमरण सिद्धार्थ, डेव्हिड मिलर, अर्शिन कुलकर्णी, शार्दूल ठाकुर, दिग्वेश सिंग राठी, प्रिंस यादव, मॅथ्यू ब्रेट्झके, आरएस हंगरगेकर आणि युवराज चौधरी.

About Author

Rohit Shinde

Other Latest News