देश, परदेशी खेळाडूंना नाही जमले ते साई सुदर्शनचे करून दाखवले!

आयपीएलमध्ये शतकी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीमध्ये एबी डिव्हिलियर्स -विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सर्वाधिक 10 वेळा शतकी भागिदारी केली आहे.

मुंबई :  गुजरात टायटन्सचा लखौन विरोधाच्या सामान्यात पराभव झाला. मात्र, गुजरातचा स्टार फलंदाज साई सुदर्शन याने लखनौ विरोधात फिफ्टी करत अनोखा विक्रम आपल्या नावावर केला.एकाच मैदानावर सलग पाच फिक्टी करण्याचा विक्रम साई सुदर्शन याने केला होता. मात्र, आजच्या सामन्यात फिक्ट करत यंदाच्या आयपीएलमध्ये 300 धावांचा टप्पा पार करणारा पहिला बॅटर बनला.

शतकी भागीदाराची विक्रम

आयपीएलमध्ये शतकी भागीदारी करणाऱ्यांच्या यादीमध्ये एबी डिव्हिलियर्स -विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी सर्वाधिक 10 वेळा शतकी भागिदारी केली आहे. तर, शिखर धवन आणि डेविड वाॅर्नर हे दुसऱ्या स्थानावर होते त्यांनी सहा वेळा अर्थशतकी भागिदारी केली होती. मात्र, आजच्या लखनौ विरुद्धच्या सामन्यात साई सुदर्शन- शुभमन गिल यांनी शतकी भागिदारी करत सहा वेळा शतकी भागिदारीचा विक्रम करत धवन-वाॅर्नरची बरोबरी केली.

एकाच मैदानावर सलग पाच फिफ्टी

राजस्थान विरोधात अर्धशतक करत साई सुदर्शनने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलग पाच अर्धशतक करण्याचा विक्रम केला. पूर्वी बंगळूरकडून खेळणारा एबी डिव्हिलियर्सने याच्या नावावर हा विक्रम होता. त्या विक्रमाची सुदर्शनने बरोबरी केली होती.

आयपीएलमध्ये 2025 मध्ये सर्वाधिक रन्स ( हैद्राबाद विरुद्ध पंजाबच्या समान्याच्याआधी)

साई सुदर्शन – 329
निकोलस पूरन – 288
मिचेल मार्श – 265
जोस बटलर – 213

 


About Author

Arundhati Gadale

Other Latest News