अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडीयमवर झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान राॅयल्सच्या सामन्यात गुजराने सलग चौथा विजय मिळवला. तर, राजस्थानला आणखी एका धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. 218 रन्सचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेली राजस्थान टीम अवघ्या 159 धावा करू शकली.
पहिल्यांदा बॅटींग करण्यासाठी मैदानात उतरलेली गुजरातला सुरुवातीलाच झटका बसला. कर्णधार शुभमन गिल अवघ्या चार धावांवर आऊट झाला. त्यामुळे गुजरातची अवस्था एक बाद 14 झाली होती. मात्र, ओपनर बॅटर साई सुदर्शन याने आपली धुव्वाधार बॅटींग सुरू ठेवले. तीन सिक्स आणि आठ फोरच्या मदतीने त्याने अवघ्या 53 चेंडूत 82 धावांची खेळी केली. जोस बटलर आणि शाहरूख खाने यांनी महत्त्वपूर्ण भागिदारी करत संघाला 200 चा टप्पा पार करून दिला.

संघाने विजयासाठी 218 रन्सचे टार्गेट
राजस्थान रायल्सकडून जाॅफ आचरा याला एक विकेट तर तुषार देशपांडे यांनी दोन विकेट मिळवल्या. मात्र त्यासाठी त्याने चार ओव्हारमध्ये तब्बल 53 रन्स मोजले. कर्णधार संजू सॅमसंग आणि शिमराॅन हिटमायर यांना वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टीकता आले नाही. प्रसिद्ध कृष्णा याने राजस्थानचे तीन जणांना आऊट केले तर राशिद खान याने देखील आपला जलवा कायम ठेवत दोघांना बाद करत सामाना गुजरातच्या बाजुने वळवला. संजू सॅमसंग 41 रन्स आणि हिटमायर याने 51 रन्स केले.
साई सुदर्शनच्या नावावर खास विक्रम
राजस्थान विरोधात अर्धशतक करत साई सुदर्शनने खास विक्रम आपल्या नावावर केला. सलग पाच मॅचमध्ये पाच अर्धशतक करण्याचा विक्रम साईच्या नावावर झाला. हा विक्रम करणार तो आयपीएलमधील पहिलाच भारतीय बॅटर ठरला. आधी आरसीबीकडून एबी डिव्हिलियर्सने हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
यशस्वी पुन्हा अपयशी
राजस्थानचा स्टार बॅटर यशस्वी जैस्वाला या आयपीएलमध्ये सूर घावत नसल्याचे दिसत आहे. आपल्या विस्फोटक बॅटींगने समोरच्या टीमला नामोहर करणाऱ्या यशस्वीला मागील काही सामान्यांपासून स्वस्ता माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे गुजरात विरुद्ध त्याला सूर गवसणार का याची चर्चा होती. मात्र, अवघ्या सहा धावांवर अर्शद खानने त्याला कॅच आऊट केले.