चेन्नई: आयपीएल 2025 च्या मोसमातील 43 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन संघांमध्ये खेळला जाणार आहे. दोन्ही संघ विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. आज संध्याकाळी ठिक 7.30 वाजता चेन्नईच्या एम. चिंदबरम स्टेडियमवर हा सामना पार पडेल. दोन्ही संघांना चालू आयपीएल सीझनमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही, अशा परिस्थितीत दोन्ही संघ आजच्या या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील.
कोण मारेल बाजी?
दोन्ही संघांनी सातत्याने खराब कामगिरी केल्याचं चित्र यंदाच्या या आयपीएल सीझनमध्ये पाहायला मिळालं. सीझनमध्ये खेळलेल्या 8 पैकी अवघ्या 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आल्याने चेन्नई गुणतालिकेत सध्या दहाव्या स्थानावर आहे. संघाकडे अवघे 4 गुण आहेत. तसेच नेट रन रेटदेखील वजा आहे. ही आजवरच्या इतिहासातील चेन्नई संघाची सर्वाधिक खराब कामगिरी मानली जात आहे.

दुसरीकडे सनरायजर्स हैदराबाद संघाची देखील परिस्थिती वेगळी नाही. खेळलेल्या 8 पैकी अवघे 2 सामने संघाला जिंकता आले आहे. संघाकडे सध्या 4 गुण असून हा संघ गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे. तसेच रन रेट वजा -1.361 आहे. हैदराबाद असो वा चेन्नई दोन्ही संघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
दोन्ही संघांमधील शेवटचे 21 सामने विचारात घेतले असता लक्षात येते की, यापैकी चेन्नईने 15 तर हैदराबादने अवघे 6 सामने जिंकले आहेत. यामध्ये चेन्नईचं पारडं जड दिसत असलं तरी क्रिकेट जाणकारांच्या मते सांघिक कामगिरीच्या जोरावर आजचा सामना सनरायजर्स हैदराबाद जिंकू शकते.
प्लेयिंग इलेव्हन हैदराबाद – सीएसके
सीएसके: आंद्रे सिद्धार्थ, आयुष म्हात्रे, डेवॉन कॉन्वे, राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, दिपक हुडा, रचिन रविंद्र, रामचंद्र घोष. महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जडेजा, सॅम करन, शिवम दुबे, खलील अहमद यांसारखे खेळाडू चेन्नईच्या संघाकडे आहेत. संघावर सांघिक कामगिरी करत विजय मिळवण्याची जबाबदारी असेल.
हैदराबाद: हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स या सीझनमध्ये तितकासा यशस्वी ठरलेला नाही. अभिषेक मनोहर, ट्रेविस हेड , इशान किशन यांच्यावर फलंदाजीची धुरा असेल, तर मोहम्मह शामी, पॅट कमिन्स या गोलंदाजी सांभाळावी लागेल.