IPL 2025: आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स भिडणार!

आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. नेमका कोणता संघ हा सामना जिंकू शकतो, जाणून घेऊया सविस्तर...

लखनऊ: आयपीएल 2025च्या मोसमातील आज 30 वा साखळी सामना खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन संघ आमने सामने असतील. लखनऊच्या एकना बी स्टेडीयमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल.

कुणाचं पारडं जड?

6 पैकी चार सामने जिंकून लखनऊचा संघ 8 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. तर, सीएसकेने 6 पैकी पाच सामने गमावले आहेत.
आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नईचा संघ शेवटच्या म्हणजेच 10 व्या स्थानावर आहे. दुसरीकडे लखनऊ आणि चेन्नई या दोन्ही संघातील आजवरचा
इतिहास पाहिला असता असे लक्षात येते की, शेवटच्या 5 पैकी लखनऊने 3 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईला अवघा एक सामना जिंकता आला
आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे आकड्यांच्या बाबतीत सुपर जायंट्स या ठिकाणी सरस ठरताना दिसतात.

चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत लखनौ सुपर जायंट्स संघाने त्यांच्या 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यांनी सनरायझर्स हैदराबाद
,मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांचा पराभव केला आहे, ज्यामध्ये गेल्या तीन सामन्यांमध्ये सलग विजयांचा 
समावेश आहे. दुसरीकडे चेन्नईच्या संघाची अत्यंत वाईट स्थिती असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांपैकी सीएसकेने फक्त एकच
 सामना जिंकला आहे. सीएसकेने फक्त मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यांना कोलकाता, पंजाब, बेंगळुरू, दिल्ली आणि राजस्थान
कडून पराभव पत्करावा लागला आहे. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स ची कमान ऋषभ पंतच्या हातात असेल, तर दुसरीकडे चेन्नई सुपर 
किंग्सची सुत्रे महेंद्रसिंग धोनीच्या हातात असणार आहेत.

चेन्नईचं आव्हान संपुष्टात?

दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावतील, लखनऊ सुपर जायंट्सना गुणतालिकेत वर जात प्ले ऑफ्समध्ये स्थान मिळवायचे आहे. त्यासाठी संघ प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे चेन्नईने आजच्या सामन्यात विजय न मिळविल्यास संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येणार आहे. आयपीएल जाणकारांच्या मते आजचा हा सामना लखनऊचा संघ जिंकण्याची अधिक शक्यता आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News